मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना. धों. महानोर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2023 | 11:08 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Namdeo Mahanor Passed Away

ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना. धों. महानोर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Namdeo Mahanor Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. शिवाय त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेरीस आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. महानोर यांच्या काव्यसंग्रहांना मराठी वाचकांची अधिकाधिक पसंती मिळाली. आजही त्यांचे काव्यसंग्रह मराठी वाचकांच्या लक्षात आहेत. महानोर यांच्या निधनानंतर सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे.

काव्यसंग्रहांबरोबरच महानोर यांनी चित्रपटांसाठी गीतेही लिहिली. त्यांनी लिहिलेल्या गीतांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महानोर यांच्या निधनानंतर मराठी प्रेक्षकही हळहळ व्यक्त करत आहेत. शुक्रवारी (३ ऑगस्ट) त्यांच्या गावी म्हणजेच पळसखेड येथे नामदेव महानोर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे… pic.twitter.com/SF42UsISfp

— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2023

ना. धों. महानोर यांच्या कवितासंग्रहाचा एक वेगळाच चाहतावर्ग होता. ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवेलागणीची वेळ’, ‘पावसाळी कविता’, ‘रानातल्या कविता’, ‘गपसप’, ‘गावातल्या गोष्टी’ यांसारखे त्यांचे काही कवितासंग्रह विशेष लोकप्रिय ठरले. शिवाय ‘अजिंठा’ या त्यांच्या कवितासंग्रह वाचकांनी अगदी डोक्यावर उचलून धरला होता.

आणखी वाचा – आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन, उत्कर्ष शिंदेने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला, “तुझ्यासारखा…”

View this post on Instagram

A post shared by Sayaji Shinde (@sayaji_shinde)

एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, उरुस, अजिंठा, यांसारख्या चित्रपटांसाठी महानोर यांनी लिहिलेली गीते विशेष लोकप्रिय ठरली. इतकंच नव्हे तर १९७८साली महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. राजकीय श्रेत्रामधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. शरद पवार यांनीही ट्वीट करत महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags: entertainmentits majjamarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Suchitra Bandekar Incident

मराठी सिनेसृष्टीची लकीचार्म का आहे सुचित्रा बांदेकर? स्वतःच उघड केलं गुपित, म्हणाली, "माझ्यावर स्वामींची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.