Tharal Tar Mag Director Buys New Home : ‘ठरलं तर मग’ ही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच अव्वल ठरते. मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या भूमिकेत दिसणारे अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात.
मालिकेच्या यशाचं श्रेय केवळ कलाकारांनाच नाही, तर पडद्यामागील संपूर्ण टीमलाही जातं. गेल्या ३ वर्षांपासून या मालिकेचं दिग्दर्शन सचिन गोखले करत आहेत. त्यांच्या दिग्दर्शनामुळेच मालिका सातत्याने टीआरपीमध्ये आघाडीवर राहिली आहे. सध्या सचिन गोखले खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतंच नवीन घर घेतलं असून ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे चाहत्यांशी शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या नव्या घराची सुंदर झलक पाहायला मिळते. आकर्षक इंटिरियर आणि परिपूर्ण सजावट यामुळे हे घर चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची लगीनघाई, दोघेही जयपूरला रवाना, Wedding Glowने वेधलं लक्ष
विशेष म्हणजे त्यांचं हे नवं घर १९व्या मजल्यावर आहे. घराचं प्रवेशद्वार युरोपियन स्टाइलमध्ये सजवलेलं असून त्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर जुई गडकरीने “सुंदर…” अशी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्री मोनिका दबडे हिनेही “सुंदर घर आहे, मी खूप काही कॉपी करणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे.




