बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो माझ्यावर चिडचिड करत…”, हेमा मालिनीच्या लेकीचं आधीच नवऱ्याबरोबर बिनसलं होतं, म्हणालेली, “त्याच्या गरजा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 6:40 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Esha deol husband bharat takhtani cranky and irritated after 2nd daughter

"तो माझ्यावर चिडचिड करत…", हेमा मालिनीच्या लेकीचं आधीच नवऱ्याबरोबर बिनसलं होतं, म्हणालेली, "त्याच्या गरजा…"

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी व अभिनेते धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओल नुकतीच पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. काल (६ जानेवारी) रोजी भरत व ईशा यांनी संयुक्तपणे त्यांच्या घटस्फोटाबाबत माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर काल दोघांनी एका निवेदनाद्वारे त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला आहे. यात त्यांनी लग्नाच्या १२ वर्षानंतर परस्पर संमतीने आम्ही वेगळे होत आहोत असं म्हटलं.

दरम्यान, ईशा-भरत यांच्या नात्यात त्यांच्या दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर दुरावा आला असल्याचे मत स्वत: अभिनेत्रीने व्यक्त केलं आहे. ईशाने २०२०मध्ये ‘अम्मा मिया: स्टोरीज, ॲडव्हाइस अँड रेसिपीज फ्रॉम वन मदर टू अदर’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात तिने सांगितलं होतं की तिच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा भरतला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे तो चिडचिड करत असल्याचे तिने म्हटले.

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी, हाती गोल्ड मेडल अन्…; नवऱ्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “बायको तुझा…”

‘डीएनए’च्या वृत्तानुसार, ईशाने तिच्या पुस्तकात असे लिहिले आहे की, “माझ्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर काही काळाने माझ्या लक्षात आलं की, भरत चिडचिड करत होता. त्याला वाटलं की मी त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. प्रत्येक नवऱ्याला असं वाटणं अगदी साहजिक आहे, कारण त्यावेळी मी राध्या व मियारा (ईशाची मुली) यांच्या पालनपोषण करण्यात व्यस्त होते. मी माझे पुस्तक लिहिण्यात आणि प्रोडक्शन मीटिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय, असं त्याला वाटत होतं. मला माझ्या चुका लगेच लक्षात आल्या.”

आणखी वाचा – भयंकर मॅसेजस, धमक्या अन्…; ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर बोलल्यानंतर, प्रियदर्शिनी इंदलकरला विचित्र अनुभव, म्हणाली, “३-४ दिवस…”

यापुढे तिने असं म्हटलं की, “भरतच्या गरजा खूप कमी आहेत आणि जर मी त्याची काळजी घेऊ शकत नाही, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. यानंतर मी ताबडतोब माझ्या चुका दुरुस्त करायचं ठरवलं. मग मला समजलं की, बराच काळ झाला मी त्याच्याबरोबर डेट नाईट किंवा चित्रपट पाहण्यासाठी गेले नाही. यानंतर मी अनेकदा त्याच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी छान ड्रेस घालून आवरलं”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सासू हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भरत तख्तानी सहभागी झाला नव्हता. तेव्हापासूनच ईशा-भरत यांच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चा सुरू झाल्या. आणि काल जाहीर निवेदनाद्वारे विभक्त झाल्याचं सांगितलं.

Tags: Bharat Takhtanibollywood actressbollywood newsEsha deolIsha Bharat DivorceIsha Bharat Divorce Newsईशा देओलईशा भरत घटस्फोटबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीभरत तख्तानी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Actress ankita lokhande first reaction on bigg boss 17 show winner munawar faruqui

मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर अंकिता लोखंडे नाराज, पहिल्यांदाच म्हणाली, “खूप वाईट अवस्था...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.