गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भयंकर मॅसेजस, धमक्या अन्…; ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर बोलल्यानंतर, प्रियदर्शिनी इंदलकरला विचित्र अनुभव, म्हणाली, “३-४ दिवस…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 4:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress priyadarshini indalkar says she is getting bad comments messages after reacting on lalit kala Kendra issue see the details

भयंकर मॅसेजस, धमक्या अन्...; ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर बोलल्यानंतर, प्रियदर्शिनी इंदलकरला विचित्र अनुभव, म्हणाली, “३-४ दिवस...”

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी ‘जब वी मेट’ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड केली. यावर कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी निषेध व्यक्त केला होता. यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरनेही निषेध व्यक्त करत तिची प्रतिक्रिया दिली होती.  

प्रियदर्शिनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने अभाविपच्या कृत्याचा निषेध करत असे म्हटले होते की, “ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध”. दरम्यान अभिनेत्रीची ही पोस्ट तूफान व्हायरल झाली होती. यावर तिला अनेक धमक्या, मॅसेजेस आणि कमेंट्स येत होते. यावर अभिनेत्रीने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियदर्शिनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला लेखक, अभिनेता हितेश पोरजेने लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे आणि त्यावर असं लिहिलं आहे की, “ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले ३-४ दिवस मला अनेक भयंकर मॅसेजेस, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. त्यावर ही पोस्ट कदाचित काही गोष्टी सोप्या करून सांगेल.”

आणखी वाचा – Video : “देवेंद्रजींकडून मी घेऊन आले…”, हळदी कुंकू कार्यक्रमात पतीसाठी अमृता फडणवीसांचा हटके उखाणा, हसत म्हणाल्या, “ज्यांनी मारले…”

यावर प्रकरणावर हितेशने पोस्ट भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको.”

आणखी वाचा – बंगला व गाडी विकली, कपडेही नाहीत अन्…; आमिर खानच्या भाच्यावर बिकट वेळ, घरातही फक्त ३ प्लेट्स, २ कॉफी मग आणि…; म्हणाला, “मुलीसाठी…”

तसेच या पोस्टच्या शेवटी त्याने असं म्हटलं आहे की, “ललितच्या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त व्हायला आत्तातरी माझ्याकडे फक्त शब्द आहेत. ‘निषेध’, ‘पाठिंबा’ ह्या शब्दांसोबतच हे अजून काही शब्द माझ्या ललितच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी. आपल्याकडे शब्द आहेत, ते व्यक्त करायला माध्यम आहे, त्याचा वापर करू. झुंडी सतत अंगावर येत राहणार. त्यांना आपल्या कामाने, प्रेमाने मैलभर कोलवत राहू. सोबत फुले, आंबेडकर आहेतंच!”

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीललित कला केंद्रप्रियदर्शनी इंदलकरentertainment newsFine Arts Centermarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newspriyadarshini indalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Prathamesh Laghate congratulated Mugdha Vaishampayan for winning gold medal in post graduation by sharing her special photo on social media

मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी, हाती गोल्ड मेडल अन्...; नवऱ्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “बायको तुझा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.