शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर अंकिता लोखंडे नाराज, पहिल्यांदाच म्हणाली, “खूप वाईट अवस्था…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 7:43 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress ankita lokhande first reaction on bigg boss 17 show winner munawar faruqui

मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर अंकिता लोखंडे नाराज, पहिल्यांदाच म्हणाली, “खूप वाईट अवस्था...”

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो संपून आता इतके दिवस उलटून गेले आहेत, तरीदेखील या शोची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी झालेली नाही. ‘बिग बॉस १७’च्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरले. ‘बिग बॉस’च्या घरात असताना प्रत्येक स्पर्धकाची चांगलीच चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. पण आता हा शो संपला असला तरी या शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे ही या शोच्या विजेतेपदाची दावेदार होती. पण अंतिम टप्प्यावर तिचं या घरातील प्रवास संपल्यामुळे तिला या घरातून बाहेर पडावे लागले.

दरम्यान, मुनव्वरच्या विजयावर अंकिता लोखंडे नाराज असल्याच्या चर्चा असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहेत. यावर आता स्वत: अभिनेत्रीने भाष्य केले आहे. मी मुनव्वरच्या विजायावर नाराज नसल्याचे मत तिने व्यक्त केलं आहे. अंकिता लोखंडेने नुकतीच ‘ई-टाईम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मुनव्वर फारुकी विजेता बनल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना तिने असे म्हटले की, “‘बिग बॉस १७’चे विजेतेपद मुनव्वरने पटकावल्यामुळे  मी अजिबात नाराज नाही. मला हे स्पष्ट करायचे आहे. गेले ४ दिवस आम्ही सतत शूटिंग करत होतो. त्यामुळे माझी प्रकृती ठीक नव्हती. माझी अवस्था खूप वाईट होती आणि मला घरी जायचे होते. आदल्या दिवशी आम्ही पावसाचा सीक्वेन्सही शूट केला आणि ६ वाजता झोपलो. त्यानंतर पुन्हा ७ वाजता आम्हाला पुन्हा शूटसाठी कॉल आला”.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी, हाती गोल्ड मेडल अन्…; नवऱ्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “बायको तुझा…”

यापुढे तिने असं म्हटलं की, “मी खूप दमली असल्यामुळे मुलाखती देणार नाही असं प्रॉडक्शन टीमला कळवलं. मी मुनव्वरच्या विजयाच्या निर्णयावर अजिबातच नाराज नव्हते. गेली इतकी वर्षे मी या इंडस्ट्रीत काम करत आहे, त्यामुळे इथली औपचारिकता पाळते. त्यामुळे मुनव्वरच्या विजयामुळे मी नाराज असल्याचे लोकांना वाटत असेल तर तसं अजिबात नाही. मुळात कोण जिंकेल आणि कोण हरेल या मानसिकतेने मी शोमध्ये आले होते. त्यामुळे मुनव्वरच्या विजयावर अजिबात नाराज झालेली नाही.” 

आणखी वाचा – भयंकर मॅसेजस, धमक्या अन्…; ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर बोलल्यानंतर, प्रियदर्शिनी इंदलकरला विचित्र अनुभव, म्हणाली, “३-४ दिवस…”

दरम्यान, अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये आली होती. या शोमध्ये दोघांमध्ये खूप मतभेद झाले होते. पण अंकिताचे मुनव्वरबरोबरचे नाते खूप घट्ट होते. ती मुनव्वरला तिचा लहान भाऊ मानत होती. या शोमध्ये दोघेही नेहमीच एकमेकांच्या बाजूने उभे राहिले आहेत. 

Tags: ankita lokhandebigg boss 17Bigg Boss 17 Contestantbigg boss 17 newsbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsMunawwar Farooquiअंकिता लोखंडेबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबिग बॉस १७ स्पर्धकबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमुनव्वर फारुकी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Actor Ravindra Mahajanis wife revealed his affair and addictions in the book

दारू-जुगाराचा नाद, शिक्षणही सोडलं अन्...; रवींद्र महाजनींच्या अफेअरबाबत गशमीरच्या आईचं भाष्य, म्हणाल्या, “रुग्णालयात होता कारण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.