सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इशा देओलचा पूर्वाश्रमीचा पती पुन्हा प्रेमात, घटस्फोटाच्या एक वर्षाने दिली प्रेमाची कबुली, मिस्ट्री गर्लबरोबरच्या फोटोंमुळे चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
esha Deols ex husband Bharat Takhtani fell in love

इशा देओलचा पूर्वाश्रमीचा पती पुन्हा प्रेमात, घटस्फोटाच्या एक वर्षाने दिली प्रेमाची कबुली, मिस्ट्री गर्लबरोबरच्या फोटोंमुळे चर्चा

esha Deols ex husband Bharat Takhtani fell in love : अभिनेत्री ईशा देओलपासून विभक्त झाल्यानंतर तिचा पूर्वाश्रमीचा पती भरत तख्तानी चर्चेत आले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नोंद झाली आहे. अलीकडेच, व्यावसायिकाने त्याचे काही खास फोटो त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एका मुलीसह शेअर केले आहे. हे पाहिल्यानंतर, सर्वत्र अशी बातमी पसरली आहे की ईशापासून विभक्त झाल्यानंतर भरत तख्तानी पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. भरत तख्तानी यांनी एका मुलीबरोबर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहे, असे म्हटले जाते की ती मुलगी मेघना लखानी आहे. या फोटोमध्ये भरतला मेघना मिठी मारताना दिसत आहे आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेम लुटताना दिसत आहेत.

हे खास व रोमँटिक फोटो शेअर करत भरत यांनी कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “कुटुंबात आपले अगदी अधिकृतरीत्या स्वागत आहे”. मेघनाने ही स्टोरी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर देखील शेअर केली. या व्यतिरिक्त, तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती भरतबरोबर पोज देताना दिसत आहे. एका रहस्यमय मुलीबरोबर भरतची रोमँटिक छायाचित्रे शेअर करणे बर्‍याच लोकांना आश्चर्याचे वाटत आहे. अलीकडेच इशा आणि भरत परमार्थ निकेतनमध्ये एकत्र दिसले होते, जिथे त्यांनी आध्यात्मिक गुरु स्वामी चिदानंद सरस्वती यांच्यासमवेत गंगा आरतीला हजेरी लावली.

आणखी वाचा – “विनंती समजा किंवा चेतावणी”, ‘ठरलं तर…’च्या एपिसोडवरुन फॅनपेजेसवर भडकली जुई गडकरी, म्हणाली, “नियमांचं…”

या प्रवासाच्या छायाचित्रांमध्ये, एक्स जोडपे एकत्र धार्मिक विधी करताना दिसले. त्यानंतर या दोघांमध्ये सलोखा झाला आहे असे अनुमान लावले जाऊ लागले. गेल्या वर्षी घटस्फोटाच्या पुष्टीकरणानंतर दोघेही प्रथमच एकत्र दिसले. ईशा देओलने २०१२ मध्ये व्यावसायिक भरत तख्तानीशी लग्न केले. लग्नाच्या ११ वर्षांनंतर त्यांनी वेगळे होण्याची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला.

आणखी वाचा – शेफाली जरीवालाच्या निधनानंतर नवऱ्याने केली घरच्या गणेशाची सेवा, व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “असा माणूस पाहिलाच नाही”

इशा आणि भरत यांनी त्यांच्या निवेदनात असे लिहिले होते की, “आम्ही परस्पर संमती आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने विभक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातल्या या बदलाच्या वेळी आमच्या दोन मुलांचे हित आणि कल्याण आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि आम्हाला आमच्या गोपनीयतेचा सन्मान व्हायला आवडेल”. या जोडीला दोन मुली राधा आणि मिराया आहेत, जे सहा आणि चार वर्षांचे आहेत.

Tags: bharat takhtani girlfriendEsha deolesha Deol ex husband
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Raqesh Bapat shares photos of Ganpati visarjan

राकेश बापटच्या घरच्या गणेशाच्या विसर्जनाचे फोटो व्हायरल, बाप्पाला निरोप द्यायला पूर्वाश्रमीच्या पत्नीचीही उपस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.