शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राकेश बापटच्या घरच्या गणेशाच्या विसर्जनाचे फोटो व्हायरल, बाप्पाला निरोप द्यायला पूर्वाश्रमीच्या पत्नीचीही उपस्थिती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raqesh Bapat shares photos of Ganpati visarjan

राकेश बापटच्या घरच्या गणेशाच्या विसर्जनाचे फोटो व्हायरल, बाप्पाला निरोप द्यायला पूर्वाश्रमीच्या पत्नीचीही उपस्थिती

Raqesh Bapat shares photos of Ganpati visarjan : कलाकारांच्या घराचा बाप्पा पाहण्याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. बरेच असे कलाकार आहेत जे नेहमीच स्वतःच्या हाताने घडवलेल्या गणेशमूर्तीची आराधना करतात. यांत एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे हिंदी, मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेला राकेश बापट. गणपती जवळ आले की सगळ्यांच्या नजरा या राकेशच्या इंस्टाग्राम अकाऊंटकडे लागून राहिलेल्या असतात. दरवर्षी न चुकता राकेश स्वतःच्या हाताने मूर्ती घडवतो. राकेशने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वत:च्या हाताने गणपतीची मूर्ती बनवली होती. यावर्षीही दीड दिवसासाठी त्याच्याकडे बाप्पा विराजमान झाले होते.

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याने बाप्पाच्या विसर्जनाचे काही फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राकेशसह त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवार बाप्पांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. पहिल्या फोटोत अभिनेता गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो गणपतीच्या मूर्तीला घराबाहेर घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतरच्या फोटोत तो कुटुंब व मित्र परिवारासह गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये तो प्रेमाने बाप्पाला निरोप देताना दिसत आहे.

आणखी वाचा – “सणासुदीच्या काळात…”, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “न्याय मिळावा अशी…”

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

राकेशने हे फोटो पोस्ट करत ‘गुडबाय गणू… पुढच्या वर्षी भेटू’. #thankyou #GanpatiBappaMorya #grateful असे हॅशटॅगही त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहेत. राकेशची ही पोस्ट एका विशेष फोटोमुळे अधिक चर्चेत आली आहे. तो फोटो म्हणजे राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगरामुळे. राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धीनेही त्याच्या घरी गणरायाच्या दर्शनाला हजेरी लावली. राकेशच्या घरच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनामध्ये रिद्धी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.

आणखी वाचा – “विनंती समजा किंवा चेतावणी”, ‘ठरलं तर…’च्या एपिसोडवरुन फॅनपेजेसवर भडकली जुई गडकरी, म्हणाली, “नियमांचं…”

रिद्धी आणि राकेश यांनी २०११ साली लग्न केले होते, पण ८ वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. रिद्धी आणि राकेश यांच्यातील मैत्री आजही कायम असल्याचे पाहून काहींनी आश्चर्य व्यक्त केले, तर ते काहींनी ते एकमेकांचा आदर करतात असेही म्हटले आहे.

Tags: ganesh visarjanraqesh bapatriddhi dobara
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Allu Arjun Grandmother Dies

अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन, अभिनेता मुंबईहून तातडीने रवाना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.