मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विनंती समजा किंवा चेतावणी”, ‘ठरलं तर…’च्या एपिसोडवरुन फॅनपेजेसवर भडकली जुई गडकरी, म्हणाली, “नियमांचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2025 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharlala Tar Mag

"विनंती समजा किंवा चेतावणी", 'ठरलं तर…'च्या एपिसोडवरुन फॅनपेजेसवर भडकली जुई गडकरी, म्हणाली, "नियमांचं…"

Tharlala Tar Mag : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका नेहमीच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळाली आहे. या मालिकेने, मालिकेच्या कथानकाने, मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत पुढे काय होणार?, कोणते ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात. अशातच मालिकेतील सायली म्हणजे जुई गडकरी सर्वांची लाडकी आहे. सायली-अर्जुनच्या जोडीला नेहमीच प्रेक्षक प्रेम देतात. सध्या मालिकेत अर्जुन सायलीच्या खऱ्या आई-बाबांचा शोध घेत आहे. त्यामुळे सायलीचे खरे आई-बाबा प्रतिमा व रविराज असल्याचं केव्हा समोर येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सोशल मीडियावर तर ‘ठरलं तर मग’ मालिकेचे असंख्य फॅनपेज आहेत. इतकंच नव्हेतर मालिकेचे आणि मालिकेतील कलाकारांचेही खूप चाहते आहेत. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते, त्यापूर्वीच म्हणजेच मालिकेचे भाग टेलिव्हिजनवर प्रसारित होण्यापूर्वीच मालिकेचे भाग या फॅनपेजद्वारे प्रेक्षकांना दाखविले जातात. टीव्हीवर भाग पाहण्याआधीच प्रेक्षकही सोशल मीडियावर हे भाग पाहून मोकळे होतात. अर्थात ही बाब चूक आहे आणि ही बाब जुईच्या लक्षात येताच तिने यावर आक्षेप उठविला आहे.

आणखी वाचा – शेफाली जरीवालाच्या निधनानंतर नवऱ्याने केली घरच्या गणेशाची सेवा, व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “असा माणूस पाहिलाच नाही”

फॅनपेज करत असलेली चूक जुईच्या लक्षात येताच तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट शेअर करत ‘कृपया असे करू नका’ असं म्हणत या फॅनपेजेसना आवाहन केलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ठरलं तर मग मालिकेचे झलक आणि संपूर्ण मालिका पाहण्यासाठी लिंक जॉईन करा असं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत सायली म्हणते, “कृपया ही विनंती समजा किंवा चेतावणी समजा. पण, अशाप्रकारे मालिकेचे एपिसोड टेलिव्हिजनवर टेलिकास्ट होण्याआधी शेअर करु नका. कृपया असं करु नका. आपण काही नियमांचं पालन करुयात”, अशी विनंती केली आहे.

आणखी वाचा – “काहीच काम करत नाही”, हिना खानच्या सासूची तक्रार, टेलिव्हिजन शोदरम्यान बोलली, म्हणाली, “हिच्याशी पंगा…”

‘ठरलं तर मग’ मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, मालिका सगळ्यांनी टेलिव्हिजनवर रात्री ८:३० वाजता पाहावी असं जुईने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याशिवाय प्रेक्षक ही मालिका जिओहॉटस्टारवर सुद्धा पाहू शकतात.

Tags: jui gadkarimarathi serialTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Riteish Deshmukh Maratha support

"सणासुदीच्या काळात…", मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "न्याय मिळावा अशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.