शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 17, 2024 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Elvish Yadav is arrested by Noida police in snake venom case

‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई

‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गेले काही दिवस सोशल मीडियासह इतर अनेक माध्यमांत त्याच्या नावाच्या चांगल्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. आज या कारणामुळे तर उद्या त्या कारणामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा या सतत सुरुच असतात. अशातच त्याला नुकतीच अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

एल्विशला रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थ म्हणून सापाचे विष वापरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थ म्हणून सापाचे विश वापरणाऱ्या टोळीची नोएडा पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत एल्विशचे नावही समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशला चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान एल्विश पोलिसांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

आणखी वाचा – लता मंगेशकरांशी तुलना झाल्यामुळे अनुराधा पौडवाल यांचा बॉलिवूडला अलविदा, स्वत:चा खुलासा करत म्हणाल्या, “संगीताला महत्त्व…”

नोएडा पोलिसांनी सापाच्या विषाचे काही नमुने जयपूर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी चाचणीसाठी पाठवले होते. हे कोब्रा-क्रेट प्रजातीच्या सापांचे विष असल्याचे अहवालात सांगण्यात आले. या प्रकरणी नोएडा सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात आणखी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप खासदार मनेका गांधी यांच्या संस्थेने प्रथम एल्विशविरोधात एफआयआर दाखल केले होते.

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला बहूचर्चित ‘हनुमान’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

एल्विशला नोएडाच्या सेक्टर ११३ येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एल्विश यादववर पार्ट्या आणि क्लबमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला असून पार्ट्यांमध्ये सापाचे विश वापरले जाणे वा त्याचे सेवन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याच कारवाईअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.

Tags: Bollywood entertainment newsElvish Yadav Arrested
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Titeeksha Tawde made special dish for Siddharth Bodke actor shared special photo

कोळंबी, सुरमई, रस्सा अन्…; तितीक्षा तावडेने नवऱ्यासाठी बनवला खास बेत, सिद्धार्थ बोडके फोटो शेअर करत म्हणाला, "बायको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.