कलाकार म्हटलं की तो बहुरंगी, बहुढंगी असतोच. अनेक कला जोपासत तो त्याच्यातलं वेगळेपण साऱ्यांच्या समोर सिद्ध करायला नेहमीच सज्ज असतो. चाहतेही या कलाकारांच्या कलेला वाव देत असतात. कलाकारातील कला कलाकार जेवढ्या आत्मीयतेने जोपासतो तेव्हढ्याच आत्मीयतेने प्रेक्षकही कलाकारांच्या आवडीनिवडी समजून घेतात. असाच एक बहुगुणी कलाकार जो साऱ्या महाराष्ट्राचा लाडका आहे तो म्हणजे अभिनेता ओंकार भोजने. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड करणाऱ्या ओंकारने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं.(Onkar Bhojane Performance)
पहा नाटकादरम्यान ओंकारने प्रेक्षकांना कस केलं खुश (Onkar Bhojane Performance)
ओंकारचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आलाय. ओंकारसध्या आपल्याला करून गेलो गाव या नाटकांत काम करताना दिसतोय. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ओंकारने त्याची कला सादर केली. तू दूर का ही ओंकारने गायलेली कविता त्याने नाटकाच्या प्रयोगादरम्यान सादर केली. कविता सादर केल्यानंतर ओंकारला कौतुकाची थाप मिळाली ती टाळ्यांचा कडकडातुन. तू दूर का ही ओंकारने याआधीहीसादर केली कविता बरीच व्हायरल झाली होती. प्रेक्षकांच्या मनावर ओंकारने त्याच्या स्वभावातून, अभिनयातून कायमच राज्य केलं आहे.
सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता.त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीकडे पावलं टाकत सरला एक कोटी हा चित्रपट केला. करून गेलो गाव या नाटकातून आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे नाटक कोंकणी असून या नाटकांत तो अभिनेता भाऊ कदम सोबत रंगमंच शेअर करताना दिसतोय.(Onkar Bhojane Performance)
हे देखील वाचा – समीरने रसिकाला दिली कौतुकाची भेट
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ओंकारने एक्झिट जरी घेतली असली तरी आजही सारा महाराष्ट्र ओंकारच्या स्किट्सला, ओंकारला मिस करताना दिसतोय. त्याच्या प्रत्येक चाहत्याला अजूनही आशा आहे की ओंकार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत परतेल.
