चर्चा हे नाव ऐकलं कि एक कार्यक्रम आणि त्यातील कलाकार आपल्या सगळ्यांच्या समोर येतात तो कार्यक्रम म्हणजे धमाल विनोदी शो महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा कार्यक्रम आणि कलाकार आज सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कार्यक्रमातील विविध स्किट्स मधून निखळ विनोद निर्माण करणं या मध्ये हास्यजत्रेतील सगळेच कलाकार इतर विनोदी कार्यक्रमांच्या तुलनेत उजवे ठरतात. पण फक्त स्किट्स साठीच नाही तर यातील कलाकार त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटस वरील पोस्ट्स मधून सुद्दा प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.(Vanita Kharat new look)
कधी एकमेकांच्या पोस्ट मध्ये कमेंट्स करून, कधी विनोदी कॅप्शन्स नि तर कधी एकमेकांचे सुंदर फोटोज काढून एकमेकां प्रतीची मैत्री निभावत कलाकारांची पडद्यामागची मैत्री ही किती निखळ असते याच उत्तम उदाहरण प्रेक्षकांसमोर ठेवतात.

बंगाली लुक मधील असाच एक सुंदर फोटो अभिनेत्री वनिता खरात ने शेअर केला आहे आणि त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये वनिताने ‘ यू नजर की बात की और दिल चुरा गए, हम तो समझते थे बुध, तुम तो धड़कन सुना गए’ अशी छान ओळ लिहिली. वणिताच्या नवऱ्याने सुद्दा कंमेंट करत तिच्या या लुकच कौतुक केलं मात्र कौतुक होत असलेला हा फोटो नक्की काढलाय कोणी हे वनिता विसरली आहे. म्हणून तिने प्रियदर्शनी आणि शिवाली दोघीना या फोटोच क्रेडिट दिल आहे. वनिता, शिवाली, प्रियदर्शनी आणि हास्यजत्रेतील इतर कलाकार हे ऑफस्क्रिन सुद्दा एकमेकांचे चांगले मित्र आहेत.(Vanita Kharat new look)