Durga Serial Artist Set Fun : सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद देखील मिळत आहे. अशातच हल्ली ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचे नाव ‘दुर्गा’ असे आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आपल्या कुटुंबाचं सुख हिरावून घेतलेल्या माणसाचा बदला घेण्यास निघालेल्या एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट प्रेक्षकांना ‘दुर्गा’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
ज्या घराचा उंबरठा तिने ओलांडला आहे, त्यांच्याच विरोधात आपल्याला लढायचं आहे हे कळल्यानंतर दुर्गा कसा मार्ग काढणार हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘दुर्गा’ या मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेत अभिषेकची भूमिका अभिनेता अंबर गणपुळे साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
मालिकेत अंबर व रुमानी यांची जोडी विशेष लक्षवेधी ठरत आहे. मालिकेच्या सेटवरही ही मालिकेतील कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसतात. नुकताच मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अंबर स्वतःच्या हाताने सेटवर अंडा बुर्जी बनवताना दिसत आहे. अंबरसह नम्रता प्रधानही त्याला मदत करताना दिसत आहे. सेटवरची कलाकारांची ही धमाल मस्ती नम्रताने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून पाहायला मिळतेय.
आणखी वाचा – बॉटलमध्ये लघवी करायचा सुप्रसिद्ध अभिनेता, सेटवरील विचित्र वागणूकीमुळे इतरांनाही त्रास, खळबळजनक आरोप अन्…
अंबर पुण्यातच वास्तव्यास असून सिम्बॉईसीस कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. अभिनयाबरोबर हॉटेल मॅनेजमेंटचे देखील त्याने प्रशिक्षण घेतले होते. मात्र अभिनयाची ओढ त्याला मालिका सृष्टीत घेऊन आली. ‘ती फुलराणी’ या मालिकेत अंबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर लहान मोठ्या ऍडफिल्मसाठी त्याने काम करण्यास सुरुवात केली. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अंबर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने साकारलेली आदित्यची भूमिका खूपच लोकप्रिय झाली.