शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खरं नाव वेगळंच, शेजाऱ्यांनी टाकलेलं अन्न खायची अन्…; इतरांपेक्षा वेगळं होतं राखी सावंतचं आयुष्य, आता मात्र…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 25, 2023 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rakhi Sawant Struggle Story

खरं नाव वेगळंच, शेजाऱ्यांनी टाकलेलं अन्न खायची अन्...; इतरांपेक्षा वेगळं होतं राखी सावंतचं आयुष्य, आता मात्र...

ड्रामा क्वीन या नावाने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. आजवर राखीने तिच्या बिनधास्त व बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःची अशी वेगळीच छाप पाडली. राखी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना हसवायला ती कधीही मागे पुढे पाहत नाही. मनोरंजन हे राखीचं ब्रीदवाक्य आहे. राखी सावंत ही कुणीही वारसा नसताना स्वमेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत रुजू झाली. (Rakhi Sawant Struggle Story)

मुळात राखीचं खरं नाव राखी सावंत नसून तिचं खरं नाव वेगळंच आहे, याबाबतचा खुलासा राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान केला आहे. यावेळी केवळ खरं नावंच नव्हे तर तिने तिच्या सुरुवातीच्या कठीण काळाबाबतही भाष्य केलं आहे. राजीव खंडेलवालच्या ‘ज ज्बात’ नावाच्या शोमध्ये राखी सहभागी झाली होती. या शोमध्ये राखीचं खरं नाव समोर आलं होतं. राजीव याने राखीचं स्वागत करताना ‘आज या शोमध्ये कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही. कारण मी आज राखी सावंतशी नाही तर निरू भेडा हिच्याशी बोलणार आहे’, असं म्हटलं.

आणखी वाचा – “तुझ्याशिवाय माझं आयुष्यच…”, लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची पोस्ट, म्हणाली, “माझ्या लेकामुळे…”

स्वतःचं खरं नाव ऐकून राखी थोडी गोंधळते, आणि तिला धक्काच बसतो. नाव ऐकून राखी आश्चर्यचकित होते आणि ती तिचं खरं नाव नीरू असल्याचे सांगते. राखीने पुढे सांगितले की, तिला तिच्या भूतकाळाबद्दल आणि सत्याबद्दल बोलायला भीती वाटते. तिला हे देखील आठवते की तिच्या आईने तिला सांगितले होते की ती लहान असताना अनेकदा शेजाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्यातून अन्न उचलायची.

आणखी वाचा – “तू आज आमच्यात नाही आणि…”, हार्दिक जोशीवर दुःखाचा डोंगर, वहिनीच्या निधनानंतर भावुक पोस्ट, म्हणाला, “तुला नमस्कार करायचो तेव्हा…”

नृत्य व अभिनयासाठी तिच्या कुटुंबातील कोणीही तिचे कौतुक केले नाही, असे सांगून राखी म्हणाली, ‘मला घरी परवानगी नव्हती. मी थोडंसंही नाचले आणि ते आईला कळले तर ती मला बेदम मारायची. यापुढे राखी असंही म्हणाली, ‘माझ्या कुटुंबात मुलीने नृत्य करावे की नाही हा प्रश्नच चुकीचा होता. मी पुढे जाण्यासाठी आयुष्यात खूप मार खाल्ला आहे, आणि त्याच्या माझ्या अंगावर खुणा आहेत. मी अशाच परिस्थितीत वाढले आहे’.

Tags: bollywood actressbollywood newsdrama queenentertainmentrakhi sawantrakhi sawant struggle story
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Smita Tambe On Award

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा परदेशात डंका, बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सारत ठरली 'सर्वोत्तम अभिनेत्री', पुरस्कार स्वीकारताना भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.