शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगच्या वक्तव्यावर अश्लील कमेंट्स, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “पुरषांचं गलिच्छ भाषेत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 19, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
mugdha godbole on kshitee jog post

मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगच्या वक्तव्यावर अश्लील कमेंट्स, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, "पुरषांचं गलिच्छ भाषेत…"

मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर बऱ्याच न पटणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. सामाजिक मुद्द्यांवर संतप्त प्रतिक्रिया देत ही कलाकार मंडळी सोशल मीडियावर बरेचदा चर्चेत असतात. लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा गोडबोले बरेचदा सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. अशातच मुग्धाने सोशल मीडियावर घाणेरड्या भाषेत कमेंट करणाऱ्या ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत. मुग्धाने नुकतीच ‘आरपार’ या युट्युब चॅनेलतर्फे अभिनेत्री क्षिती जोग हिच्याशी संवाद साधला. (mugdha godbole on kshitee jog post)

मुलाखतीदरम्यान क्षितीने सांगितलेला एक मुद्दा चर्चेत आला आहे. यावेळी क्षितीने मंगळसूत्र न घालण्यावरुन भाष्य करत हा प्रश्न विचारणाऱ्यांना टोला लगावला आहे. क्षितीचा हा प्रेमी सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, या पोस्टवर सर्वाधिक कमेंट या वाईट विचारसरणी असलेल्या लोकांनी केल्या होत्या. या वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर मुग्धा चांगलीच संतापली आहे. मुग्धाने फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत कमेंट करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

आणखी वाचा – “मंगळसूत्र न घातल्याने असं काय होणार आहे?”, मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगला सुनावल्यानंतर स्पष्ट उत्तर, म्हणाली, “खूप वायफळ वेळ…”

“हे रील नेहमीप्रमाणे मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं. शनिवारी एपिसोड येणार म्हणून गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरु होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की इंस्टाग्रामवर या रील खाली साधारण ३००च्या वर कमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत. त्या अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. आश्चर्य वाटावं की नको असाही आता प्रश्न पडतो. क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही. चोरांची भीती वाटते”

आणखी वाचा – भुवनेश्वरीचा अपमान होताच सून भडकली, अक्षराने उपस्थित महिलांना सुनावताच सासूच्या डोळ्यात अश्रू, आताही छळ करणार का?

पुढे तिने लिहिलं आहे की, “प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही, हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो?, इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील? आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात. हे प्रश्न नाही आहेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं वाटतं की, ते कमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत. कित्येक कमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत, कराव्या लागल्या”, असं म्हणत राग व्यक्त केला आहे.

Tags: entertainmentkshitee jog trollmarathi actressMugdha Godbole angry postmugdha godbole on kshitee jog post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Dr. Nilesh Sable shared a bts video of show hasatay na hasaylach pahije 1st episode

Video : 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडल्यानंतर निलेश साबळेचा नवा शो, मात्र भाऊ कदमची साथ कायम, म्हणाला, "तुमचे आशिर्वाद..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.