शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसांद खांडेकर, नम्रता संभेरावसह इतर कलाकारांचा दंगा अनुभवायला मिळणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2025 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chiki Chiki BooBoom Boo Movie

'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसांद खांडेकर, नम्रता संभेरावसह इतर कलाकारांचा दंगा अनुभवायला मिळणार

Chiki Chiki BooBoom Boo Movie : मैत्रीची व्याख्या ही निराळीच आहे. इतर कोणत्याही नात्यापेक्षा हे नातं काहीसं वेगळंच आहे. मित्र मैत्रिणींबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस कमालीचा असतो. ते क्षण, त्या गंमती-जमती, मित्र-मैत्रिणींबरोबर होणारे वाद या गोष्टी राहून राहून आठवतात. विचार करा बऱ्याच वर्षानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींबरोबर तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर?. हो अर्थात ही रियुनियनची धमाल नव्याने अनुभवायला मिळणार आहे. कारण सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल चित्रपट २८ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

पार्टीतली गंमत आणि धमाल हे सगळं अनुभवताना येणार काही गोष्टींचं वळण या रियुनियनच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालेल्या मित्रांच्या आनंदाची रंगत वाढवणार की त्यांची पळता भुई थोडी होणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.

आणखी वाचा – प्रेमामुळे सगळं काही सहन केलं अन्…; गोविंदासह लग्नाला सुनिता यांच्या वडिलांचा होता विरोध, आर्थिक परिस्थितीही नव्हती तेव्हा…

View this post on Instagram

A post shared by चिकी चिकी बुबूम बुम ???? (@chikichiki_booboomboom)

‘इकडे आड तिकडे विहीर’ ‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख टीझर मधून करुन देण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ‘बुम बुम बुम’ टायटल सॉंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट’ निर्मित, ‘आयडियाज द एंटरटेनमेंट’ कंपनी प्रस्तुत आणि ‘स्वर्ण पट कथा’ आणि ‘प्रजाकार प्रोडक्शन्स’ यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे.

आणखी वाचा – समीर चौघुले व सई ताम्हणकरची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र, ‘गुलकंद’मध्ये धमाल भूमिकेत दिसणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. प्रशांत मडपुवार, मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना रोहन प्रधान, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, कविता राम यांचा स्वरसाज आहे. रोहन-रोहन जोडीचे जबरदस्त संगीत चित्रपटाला लाभले आहे. राहुल ठोंबरे, सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन गणेश उतेकर तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

Tags: Chiki Chiki BooBoom BooChiki Chiki BooBoom Boo moviemarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Arun Kadam Kokan Tour

Video : धमाल-मस्ती, निर्सगाचा आनंद अन्…; अरुण कदमांचा नातवासह कोकण रेल्वेने प्रवास, साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.