Arun Kadam Kokan Tour : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यात कोणतीही कमी पडू देत नाहीत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अरुण कदम. अरुण त्यांच्या उत्तम विनोदी शैलीमुळे आज जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची विशिष्ट प्रकारची बोलीभाषा आणि त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालतात. कामाबरोबरच सोशल मीडियावर ते अधिकाधिक सक्रिय असतात. खासगी आयुष्याबाबत प्रत्येक गोष्ट ते इन्स्टाग्रामद्वारे शेअर करतात. बरेचदा ते त्यांच्या कुटुंबाबरोबर धमाल, मस्तीचे तसेच त्यांच्याबरोबरचे खास क्षण आणि अनुभव चाहत्यांसह शेअर देखील करतात. अरुण यांचा सोशल मीडियावर बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो.
कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ते बरेचदा कुटुंबाबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात. अशातच आता अरुण त्यांच्या कुटुंबासह कोकण दौरा करताना दिसत आहेत. थेट कोकणात ट्रेनने प्रवास करतानाचा खास व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्टग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुण यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी, मुलगी, नातू आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. अरुण कदम त्यांच्या कुटुंबासह कोकणात एन्जॉय करायला गेले आहेत.
व्हिडीओमध्ये अरुण कदम त्यांच्या नातवाला घेऊन कोकण रेल्वेने कोकणाच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहे. रेल्वेत त्यांनी सेल्फी घेत व्हिडीओही काढला आहे. त्यांनतर एका रिसॉर्टला ते थांबलेले दिसत आहेत. कोकणात जाऊन तेथे एन्जॉय करताना ते दिसत आहेत. अरुण यांचं त्यांच्या नातवाबरोबर खास बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळतं. नेहमीच ते नातवाबरोबर काही ना काही धमाल मस्ती करताना दिसतात. आता कोकणप्रवासाचा त्यांचा हा व्हिडीओ त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : …अन् त्या महिलेने थेट आलिया भट्टचा हातच पकडला, रणबीर कपूर धावत आला आणि…; व्हिडीओ व्हायरल
अरुण कदम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या ते त्यांच्या नातवाबरोबरचे गोड क्षण शेअर करतात. अरुण कदम यांची लेक सुकन्या हिचा अथांग हा मुलगा आहे. अथांगचे अनेक व्हिडीओ ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.