प्रत्येक आई-वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी मोठं करावं. त्याचप्रमाणे कलाकार मंडळींनाही आपल्या मुलाला मोठ्या पडद्यावर पाहावं, असं मनापासून वाटतं. मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध जोडी आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकरही आपल्या आई-वडिलांप्रमाणेच सिनेमा व मालिकांमध्ये काम करत आहे. घरातून अभिनयाचा वारसा मिळूनही सोहमला सिनेसृष्टीत येण्यासाठी बराच स्ट्रगल करावा लागला. (soham bandekar)
‘नवे लक्ष्य’ मालिकेतून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सोहम बांदेकरने नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसला होता. सोहमचं स्वतःच्या नावाने एक प्रोडक्शन हाऊस असून अनेक मालिकांच्या निर्मितीची धुरा त्याने सांभाळली आहे. असं असूनही सोहम आजही अनेक ठिकाणी ऑडिशन्स व लुक टेस्ट देतोय.
अशातच यावर्षी गाजलेल्या ‘बाईपण भारी देवा’ व ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोहमबाबत एक मोठी घोषणा केली आहे. दिग्दर्शक केदार यांनी सोहमला त्यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये घेणार असल्याची घोषणा केली असून त्याला मुख्य भूमिकेत घेणार असल्याचं त्यांनी बाईपणच्या सक्सेस पार्टीत सांगितलं आहे. (kedar shinde has promised soham to play lead role in his upcoming project)
सोहम बांदेकरबद्दल काय म्हणाले केदार शिंदे ? (kedar shinde promised soham bandekar)

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोहमबद्दल बोलताना “सोहमने माझ्या या सिनेमात डेब्यू केलं असून मी त्याला एक वचन दिलंय की, सोहम जेव्हा तू परत येशील, तेव्हा माझ्या चित्रपटाचा पुढचा हिरो असेल.”, अशी थेट घोषणा करून टाकली. केदार यांच्या घोषणेनंतर त्याची आई सुचित्रा बांदेकर यांनी आनंद व्यक्त केलं असून लवकरच सोहमला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी बांदेकर कुटुंबासह चाहतेही उत्सुक झालेले आहेत.
अभिनेता सोहम बांदेकरने अभिनयासह अनेक मालिकांची निर्मिती केली असून नुकतंच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या २००वा भागानिमित्त टीमच्या सिद्धिविनायक दर्शनावेळी सोहम दिसला होता. सोहमला अभिनयाव्यतिरिक्त क्रिकेटची प्रचंड आवड असून सोशल मीडियावर तो अनेकदा क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओस शेअर करत असतो. (soham bandekar)
हे देखील वाचा : ‘मी पण चित्रपटातील नवऱ्यासारखा वागायचो पण…’ अखेर अंकुशने दिली कबुली