‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. कारण ते लवकरच ‘काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ ही डॉक्युमेंटरी सिरीज घेऊन येणार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ‘द काश्मीर फाईल्स’ या आपल्याच सुपरहिट सिनेमावर आधारित डॉक्युमेंटरी सिरीज असून काश्मिरातील खऱ्या पीडितांना आलेल्या अनुभवाचे कथन या डॉक्युमेंट्रीत करण्यात आलेले आहे. (the kashmir files director replied twitter user challenge)
एकीकडे दिग्दर्शकाने काश्मीर फाईल्सच्या नव्या भागाची घोषणा केलेली असताना दुसरीकडे अनेकजण सोशल मीडियावर काश्मीरसारख्या विविध मुद्द्यांवर आधारित सिनेमे काढण्याची मागणी दिग्दर्शकाकडे करत आहे. सध्या मणिपूर घटनेवरून मोठा वादंग उठलेला असताना आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यावरून देशभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अशातच या मुद्द्यावर सिनेमा बनवण्याची मागणी एका ट्विटर युझरने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याकडे आव्हान केलं असता त्यावर दिग्दर्शकाने उत्तर दिलंय.
काय उत्तर दिलं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘त्या’ युझरला ? (the kashmir files director replied twitter user challenge)
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी ‘काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’चा टिझर रिलीज करत या नव्या भागाची घोषणा केली होती. त्यानंतर दिग्दर्शकाने यावर एक ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटला एका ट्विटर युझरने त्यांना आव्हान केलं की, “वेळ वाया घालवू नका आणि मर्द असाल तर ‘मणिपूर फाइल्स’ हा सिनेमा बनवा”. त्यावर उत्तर देताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केलं, की “माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. पण तुला माझ्याकडूनच सगळेच चित्रपट बनवून घ्यायचे का ? तुमच्या ‘टीम इंडिया’मध्ये एकही ‘मर्द’ निर्माता नाही ?” दिग्दर्शकाचं त्या ट्विटर युझरला दिलेल्या उत्तराचं ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा २०२२ मध्ये रिलीज झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद तर मिळाला, शिवाय या सिनेमावरून बरेच वाद-विवाद देखील झालेत. ज्याची चर्चा त्यावेळेस रंगली होती. काश्मीर फाईल्स सिनेमाने तब्बल ३०० कोटींची कमाई करत कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला होता. सिनेमात अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी आदी प्रमुख भूमिकेत होते. तर नुकत्याच आलेल्या या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पल्लवी जोशी यांची झलक पाहायला मिळते. (kashmir files unreported)
PRESENTING:
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 22, 2023
The TRUE STORY of gut-wrenching GENOCIDE of Kashmiri Hindus is finally here, in their own voices.
A web series of most inhuman truth & it’s politics that even sinister GENOICDE DENIERS can’t cancel. Not anymore.
Coming soon on @ZEE5Premium #KashmirFilesUnreported pic.twitter.com/90wWZ4LEtH
हे देखील वाचा : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’चा पुढचा भाग येणार ! दिग्दर्शकाने केली घोषणा