शनिवार, मार्च 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘धडाकेबाज’मधील बाटलीतला गंगाराम आठवतोय का? दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितली यामागची मेहनत

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 27, 2023 | 10:25 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
director and actor mahesh kothare shared story of gangaram from dhadakebaj marathi movie

'धडाकेबाज'मधील बाटलीतला गंगाराम आठवतोय का? दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितली यामागची मेहनत

नव्वदीच्या काळात मराठीतील काही सर्जनशील व नावीन्यपूर्ण दिग्दर्शन करणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांपैकी आघाडीचे दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे. त्यांनी नवनवीन कल्पना साकारत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या अशाच अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘धडाकेबाज’. त्याकाळी या चित्रपटातील गंगाराम व कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या. (Mahesh Kothare Shared Story Of ‘Ganagaram’ In Dhadakebaaj Marathi Movie)

या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुहेरी भूमिका होत्या. त्यापैकी एक लक्ष्या व दुसरी बाटलीतला गंगाराम. चित्रपटात लक्ष्याला एक जादूची बाटली मिळते. त्या बाटलीत असतो तो गंगाराम आणि त्या गंगारामकडे असते ती जादूची रेती. ही रेती वापरून गंगाराम लक्ष्या व त्याच्या मित्रांची मदत करतो. पण या चित्रपटातील एक गूढ अजूनही उलगडलेलं नाही ते म्हणजे बाटलीतला गंगाराम. हा गंगाराम बाटलीत गेला कसा? याचे रहस्य आजूनही उलगडलेले नाही. यामागची नेमकी काय कहाणी आहे? हे जाणून घेऊयात.

‘बाटलीतला गंगाराम’ यामागची कहाणी थोडी रंजकच आहे. महेश यांनी एका मुलाखतीत त्यांच्या या बाटलीतल्या गंगारामचं रहस्य उलगडलं आहे. या गंगारामला बाटलीत टाकण्यासाठी अर्थात व्ही.एफ.एक्स.चे तंत्र शिकण्यासाठी महेश कोठारे अमेरिकेला गेले होते आणि यासाठी त्यांना तब्बल एक वर्षाचा कालावधी लागला होता. अमेरिकेतील ‘ट्वेन्टी सेंच्युरी ऑफ फॉक्स’ या स्टुडिओमध्ये त्यांनी एक महिना कामदेखील केले होते.

आणखी वाचा – खाण्यापिण्यापासून मालिका पाहण्यापर्यंत, अल्का कुबल त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंचे पुरवतात लाड, म्हणालेल्या, “तेवढा विचार…”

दरम्यान त्यांना या स्टुडिओमध्ये जाण्याची संधी मिळाली ती दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्यामुळे. ‘बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाच्या निमित्ताने अमेरिकेचे व्ही.एफ.एक्स.चे काही तंत्रज्ञ भारतात आले होते. यावेळी ट्वेन्टी सेंच्युरी ऑफ फॉक्समधील व्ही.एफ.एक्स. स्टुडिओचे दिग्दर्शक पॉल हेदेखील आले होते. तेव्हा पॉल यांच्याकडून व्ही.एफ.एक्सचे तंत्र शिकण्यासाठी महेश यांनी दिग्दर्शक रवी चोप्रांद्वारे पॉल यांच्याशी संवाद साधला. यावर पॉल यांनी महेश यांना अमेरिकेला येण्यास सांगितले. त्यानंतर व्ही.एफ.एक्स.चे अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी महेश यांनी अमेरिकेत १ वर्षे प्रशिक्षण घेतले.

आणखी वाचा – फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन यांनी घेतला होता मुंबई सोडण्याचा निर्णय, मात्र मनोज कुमार यांनी सावरले होतं त्यांचं करिअर

त्यावेळी अमेरिकेत व्ही.एफ.एक्स.साठी निळा पडदा वापरून चित्रपट शूट केले जात होते. त्यामुळे महेश यांनादेखील त्यांच्या बाटलीतला गंगाराम साकारण्यासाठी व्ही.एफ.एक्स.च्या एका विशिष्ट पद्धतीच्या इंटरमिडीएट निगेटिव्हची गरज होती. पण बाजारात त्या विशिष्ट पद्धतीच्या निगेटिव्हची कमतरता होती आणि बाहेरून ते आयात करायचे असल्यास अधिक प्रमाणात मागवावे लागत होते. तेव्हा महेश यांनी ‘अजूबा’ चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर परेरा यांच्याशी बोलून विशिष्ट निगेटिव्ह आयात करण्यात आले. त्यापैकी पीटर यांनी काही निगेटिव्हचा वापर करुन अजूबा चित्रपट साकारला तर काही निगेटिव्हचा वापर करुन महेश यांनी धडाकेबाज चित्रपटातील ‘बाटलीतला गंगाराम’ साकारला.  

Tags: dhadakebajentertainment newsmahesh kotharemarathi entertainmentmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

divya agarwal on divorce from husband
Entertainment

लग्नाच्या दोन वर्षातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट?, व्यवसायकाशी केलेलं लग्न, स्वतःच म्हणाली, “आम्ही वेगळे राहतो आणि…”

मार्च 7, 2026 | 4:16 pm
Lagnanatar Hoyilch Prem
Entertainment

‘लग्नानंतर होईलच…’मध्ये रम्यामुळे काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनीमध्ये भांडण?, संसारात लावली आग; मोठा TWIST

मार्च 7, 2026 | 1:43 pm
Ruchita Jamdar Eviction
Entertainment

मोठी बातमी! ‘बिग बॉस’च्या घरातून रुचिता जामदारची EXIT; रितेश देशमुखचा मोठा निर्णय

मार्च 7, 2026 | 11:43 am
dhurandhar the revenge trailer
Entertainment

दमदार डायलॉग, कलाकारांच्या जबरदस्त भूमिका अन्…; ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, ‘या’ दिवशी होणार चित्रपटगृहात दाखल

मार्च 7, 2026 | 11:30 am
Next Post
Ketaki Mategaonkar On Her Home

केतकी माटेगांवकरला तिच्या मुंबईतील घरी एकटं राहण्यास आई-वडिलांचा होता विरोध, म्हणाली, "आम्हाला सोडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.