Lagnanatar Hoyilch Prem Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत अलीकडेच लग्नसोहळ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ यांचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडताच कथानकाला नवा रंग मिळाला आहे. दरम्यान, स्टार प्रवाहने मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये काव्या आणि नंदिनीचा गृहप्रवेश होताना दिसतो. मात्र या गृहप्रवेशावेळी एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो.
आणखी वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीची बिल्डरकडून मोठी फसवणूक, ४७ लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?
गृहप्रवेशाच्या वेळी रम्या काव्या आणि नंदिनीला म्हणते, “संसारात कॉर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं असतं. आता बघूया तुमच्या दोघींच्या संसारात किती कॉर्डिनेशन आहे.” असं म्हणत रम्या त्यांच्या समोर दगडांचे छोटे गोळे टाकते आणि त्या दोघींना त्यावर चालायला सांगते. रम्याचा हा खेळ पाहून घरातील सगळेच थोडेसे हैराण होतात. हा खेळ खेळताना काव्याचा तोल जाऊ लागतो. मात्र, नंदिनी वेळेवर तिला सावरते. दोघी एकमेकींचा आधार घेत हा अवघड खेळ पार करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे पाहून रम्या मात्र चांगलीच चिडलेली दिसते. पुढे प्रोमोमध्ये काव्या आणि नंदिनी रम्याने दिलेलं आव्हान यशस्वीपणे पूर्ण करताना दिसतात. या प्रोमोमुळे मालिकेत पुढे काय घडणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आता पुढील भागांमध्ये रम्या काव्या आणि नंदिनीच्या संसारात आणखी कोणते नवे अडथळे निर्माण करणार? त्यांच्या आयुष्यात अजून कोणते ट्विस्ट येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आणखी वाचा – अनुराग डोभालचे आरोप खोटे, भावाने पुराव्यांसह समोर आणलं सत्य, पत्नीला मारहाण आणि…





