‘बॉलिवूडचा बादशाह’ अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक दर्जेदार चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर राज्य निर्माण केलं आहे. बिग बी मागील पाच दशकांपासून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. १९६९ मध्ये आलेल्या ‘सात हिंदुस्तान’ चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासासून आतापर्यंत ते अविरतपणे काम करत आहेत. इतकी वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या बिग बींना देखील काही काठिण काळाचा सामना करावा लागला होता. काही काळ अमिताभ यांचे चित्रपट चालत नव्हते तेव्हा त्यांनी बॉलिवूड सोडण्याचादेखील विचार केला होता. पण यातून त्यांना एका अभिनेत्याने बाहेर काढलं होतं आणि त्यांचं करिअर सांभाळलं होतं.
बच्चन यांचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. सात हिंदुस्तानी, संजोग, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, जबन, एक नजर, बन्सी बिरजू, बंधे हाथ आणि इतर काही चित्रपट फ्लॉप ठरले होते. हा काळ त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ होता. आणि याच फ्लॉप चित्रपटाच्या नैराश्येतून त्यांनी बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर नंतर एका दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याने अमिताभ बच्चन यांची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यात मदत केली आणि ते होते. मनोज कुमार. त्यांनी अमिताभ यांना ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती.
यानंतर एका मुलाखतीत मनोज कुमार असे म्हणाले होते की, “जेव्हा लोक अमिताभला त्यांच्या अपयशासाठी टोमणे मारत होते, तेव्हा मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता की ते एक दिवस ते मोठे कलाकार होतील.” आणि अखेर मनोज यांचे ते विधान खरे ठरले. एकेकाळी बिग बींची पहिली कमाई ५०० रुपये होते. पण आज अमिताभ हे कोट्यवधींच्या कमाईचे मालक आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळात बिग बी एका सिनेमासाठी २० लाख रुपये घेत होते. आज ते ०८ ते १० कोटी रुपये इतके पैसे आकारतात.
आणखी वाचा – वनिता खरातचं मोठं स्वप्न होणार पूर्ण, स्वतःचं खुलासा करत म्हणाली, “लवकरच तो दिवस…”
आज इतक्या वर्षांनीही ‘रोटी कपडा और मकान’ हा चित्रपट तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. यातील गाणी, अभिनय व कथानक यामुळे हा चित्रपट कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान, या चित्रपटामुळे सुरू झालेली त्यांची गाडी पुन्हा रुळावर आली आणि आजतगायत ती गाडी सुसाट धावत आहे. असं म्हणायला हरकत नाही.