लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर व अभिनेता शोएब मलिक ही जोडी सतत चर्चेत असते. दीपिकाने शोएबबरोबर दुसरे लग्न केले आहे. त्यानंतर ती मालिकाविश्वापासून दूर झाली. शोएब नुकताच ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेदरम्यान दोघांचीही ओळख झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.नंतर २०१८ साली दोघेही लग्नबंधनात अडकले. त्यांना रुहान नावाचा मुलगाही आहे. (dipika kakkar and shoaib ibrahim ramadan )
दीपिका व शोएबच्या लग्नानंतर माध्यमांमध्ये अनेक चर्चा झाल्या. दीपिकाने पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर काही कालावधीने तिने शोएबबरोबर लग्न केले. रुहानच्या जन्माआधी तिचा एकदा गर्भपातही झाला होता. तेव्हा शोएब व दीपिका हे प्रसारमाध्यमांपासून दूर होते. नंतर दीपिकाने रुहानला जन्म दिला. आता रुहानची पहिलीच रमजान असून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

रमजानचा पवित्र महिना सुरु झाला आहे. दीपिका तयारी करण्यामध्ये खूप व्यस्त आहे. तिने घर सजवण्यासाठी सर्व सामान खरेदी केले असून इफ्तारीची सर्व तयारी केलेली दिसून येत आहे. त्यानंतर शोएबने फोटो पोस्ट करत लिहिले की, “सेहरीच्या वेळी रूहान झोपल्याने मी काही शूट करु शकलो नाही. दीपिकाने लवकर जेवण बनवले होते. रूहानची झोपमोड होऊ नये म्हणून आम्ही सेहरी केली आणि झोपलो”. तसेच आपल्या पहिल्या इफ्तारीच्या तयारी करताना सांगितले की, “मी सर्व तयारी कशी करायची ही विचारण्यासाठी आईला फोन केला. तेव्हा म्हणाल्या की मी सर्व तयार केले आहे. मी आता नाश्ता बनवत आहे आणि रोजा सोडण्यासाठी घरी जात आहे”.
शेअर केलेल्या फोटोमध्ये रुहानला निळा कुर्ता पायजमा व टोपी घातली आहे. या ड्रेसमध्ये तो खूप गोड दिसत होता. त्यानंतर दीपिकाने सर्वांना जेवण वाढले आणि आपल्या पहिल्या इफ्तारीसाठी प्रार्थना केली. दीपिकाने सांगितले की, “हे सर्व एकत्रितपणे करणे खूप छान वाटते. ही रुहानची पहिलीच इफ्तारी आहे. सर्वांबरोबर नाश्ता करताना तो खूप मजा करत होता. तो सर्वांच्या ताटाकडे बघत बसला. पहिला रोजा झाल्यानंतर सर्वजण खूप खुश होते”. दीपिका व शोएब यांचा मुलगा रुहान हा सध्या आठ महिन्याचा असून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.