गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका कक्करच्या आठ महिन्याच्या लेकानेही केली इफ्तार पार्टी, रमजानमध्ये टोपी घालून कुटुंबियांबरोबर बसला अन्…; फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2024 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dipika kakkar and shoaib ibrahim ramadan

दीपिका कक्करच्या आठ महिन्याच्या लेकानेही केली इफ्तार पार्टी, रमजानमध्ये टोपी घालून कुटुंबियांबरोबर बसला अन्…; फोटो व्हायरल

लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर व अभिनेता शोएब मलिक ही जोडी सतत चर्चेत असते. दीपिकाने शोएबबरोबर दुसरे लग्न केले आहे. त्यानंतर ती मालिकाविश्वापासून दूर झाली. शोएब नुकताच ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेदरम्यान दोघांचीही ओळख झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.नंतर २०१८ साली दोघेही लग्नबंधनात अडकले. त्यांना रुहान नावाचा मुलगाही आहे. (dipika kakkar and shoaib ibrahim ramadan )

दीपिका व शोएबच्या लग्नानंतर माध्यमांमध्ये अनेक चर्चा झाल्या. दीपिकाने पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर काही कालावधीने तिने शोएबबरोबर लग्न केले. रुहानच्या जन्माआधी तिचा एकदा गर्भपातही झाला होता. तेव्हा शोएब व दीपिका हे प्रसारमाध्यमांपासून दूर होते. नंतर दीपिकाने रुहानला जन्म दिला. आता रुहानची पहिलीच रमजान असून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – “४५ महिने होऊनही अद्याप…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बहिणीचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाऱ्हाणं, म्हणाली, “या प्रकरणात…”

रमजानचा पवित्र महिना सुरु झाला आहे. दीपिका तयारी करण्यामध्ये खूप व्यस्त आहे. तिने घर सजवण्यासाठी सर्व सामान खरेदी केले असून इफ्तारीची सर्व तयारी केलेली दिसून येत आहे. त्यानंतर शोएबने फोटो पोस्ट करत लिहिले की, “सेहरीच्या वेळी रूहान झोपल्याने मी काही शूट करु शकलो नाही. दीपिकाने लवकर जेवण बनवले होते. रूहानची झोपमोड होऊ नये म्हणून आम्ही सेहरी केली आणि झोपलो”. तसेच आपल्या पहिल्या इफ्तारीच्या तयारी करताना सांगितले की, “मी सर्व तयारी कशी करायची ही विचारण्यासाठी आईला फोन केला. तेव्हा म्हणाल्या की मी सर्व तयार केले आहे. मी आता नाश्ता बनवत आहे आणि रोजा सोडण्यासाठी घरी जात आहे”.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ संपताच भाऊ कदमचा कुटुंबाबरोबर विमान प्रवास, बायकोही दिसते खूपच सुंदर, फोटो शेअर करत म्हणाले…

शेअर केलेल्या फोटोमध्ये रुहानला निळा कुर्ता पायजमा व टोपी घातली आहे. या ड्रेसमध्ये तो खूप गोड दिसत होता. त्यानंतर दीपिकाने सर्वांना जेवण वाढले आणि आपल्या पहिल्या इफ्तारीसाठी प्रार्थना केली. दीपिकाने सांगितले की, “हे सर्व एकत्रितपणे करणे खूप छान वाटते. ही रुहानची पहिलीच इफ्तारी आहे. सर्वांबरोबर नाश्ता करताना तो खूप मजा करत होता. तो सर्वांच्या ताटाकडे बघत बसला. पहिला रोजा झाल्यानंतर सर्वजण खूप खुश होते”. दीपिका व शोएब यांचा मुलगा रुहान हा सध्या आठ महिन्याचा असून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.      

Tags: Deepika kakkarfamilyiftar partyramdann sehariruhanshoaib ibrahimson ruhan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Amruta Deshmukh And Prasad Jawade

लग्नानंतर एकमेकांपासून लांब राहतात प्रसाद जवादे व अमृता देशमुख, भेटण्यासाठी साताऱ्याला गेली अन्…; फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.