हिंदी टीव्हीवरील प्रसिद्ध शोपैकी एक ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आजवर अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. कपिलसह कार्यक्रमातील अन्य विनोदवीरांनी कलाकारांसह प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यामुळेच हा सर्वाधिक पाहिला जाणारा लोकप्रिय हिंदी कार्यक्रम आहे. सध्या हा कार्यक्रम काही काळासाठी बंद आहे. पण याचे अनेक भाग आजही टीव्ही व सोशल मीडियावर प्रसारित होतात. (Kapil Sharma clarifies his Show entry fee)
प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं की, आपण या कार्यक्रमात झळकावं. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही प्रेक्षक विविध क्लुप्त्या लावत असतात. तर या कार्यक्रमाचे प्रेक्षक होण्यासाठी तिकिट वगैरे असते का? असा प्रश्नही विचारला जातो. अशीच एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल शर्माचा शो प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी तिकिटे विकली असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हे जेव्हा अभिनेत्याला कळले, तेव्हा त्याने हा दावा फेटाळत सर्व काही स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा – “मैं तुम्हारा बाप हूं!”, प्रदर्शनाच्या सहा दिवसानंतर ‘जवान’चा नवा प्रोमो प्रदर्शित, शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगची होतेय चर्चा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीनुसार, ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जर तुम्हाला प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असेल, तर तुम्हाला ४९९९ रुपये खर्च करावे लागतील. मात्र हे जेव्हा कपिलला समजले, तेव्हा त्याने याचा दावा फेटाळत याचा खुलासा केला आहे. यासंबंधीचं ट्विट एका युझरने केलं असून या ट्विटवर उत्तर देताना कपिल शर्मा म्हणाला, “सर, ही फसवणूक आहे. लाइव्ह शूट पाहण्यासाठी आम्ही प्रेक्षकांकडून एक रुपयाही घेत नाही. तुम्ही लोकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे. असल्या कोणात्याही फंदात पडू नका. धन्यवाद.”
हे देखील वाचा – नवऱ्याचे कपडे परिधान करुन घराबाहेर पडली हेमांगी कवी, फोटो पोस्ट करत म्हणाली, “भारीतला शर्ट ढापून…”
Sir it’s a fraud. we never charge our audiences a single penny to see the live shoot, pls beware of these kind of fraud people ???? thank you https://t.co/j2DN2Ijo9X
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) September 13, 2023
याआधीही कार्यक्रमातील तिकिटांबाबत अश्या प्रकारच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हाही त्याने संपूर्ण सत्य सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तेव्हापासून चाहते याच्या नव्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.