शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकाणार?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 26, 2023 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
digpal lanjekar directorial shivrayancha chhava marathi movie new poster is out

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकाणार?

लेखक-दिग्दर्शक व अभिनेता दिग्पाल लांजेकरने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारे  ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेरशिवराज’, ‘सुभेदार’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पालने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी दिग्पालने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. (Shivrayancha Chhava New Poster)

दिग्पालने हे पोस्टर शेअर केल्यापासूनच त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी व चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याविषयीची उत्सुकता लागली होती. अशातच आता चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या नवीन पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्यामागे एक सिंहदेखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने ५७व्या वर्षी पत्नीबरोबर केलं दुसऱ्यांदा लग्न, हिंदू पद्धतीने पार पडला विवाहसोहळ, लिपलॉक केलं अन्…

दिग्पालने हे नवीन पोस्टर शेअर करत “गर्जतो आमच्या देही…  रक्त बिंदू रक्त बिंदू… राजे आले आमचे… आले रौद्र शंभू रौद्र शंभू” असं म्हटलं आहे. हे नवीन पोस्टर प्रदर्शित होताच यावर नेटकऱ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याविषयी उत्सुकता लागली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टखाली “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार?” असं म्हणत विशाल निकम, वैभव तत्त्ववादी या अभिनेत्यांची नावे घेतली आहेत. तर अनेकांनी “जय शिवराय, जय शंभूराजे” अशा अनेक कमेंट्स करत या पोस्टला चांगलाच प्रतिसाद दिला आहे..  

आणखी वाचा – ‘रमा राघव’ फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लागली हळद, हातावर मेहंदीमध्ये शिवनेरी बस, मुंबई-पुणेची डिझाइन, फोटो व्हायरल

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर व मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माते भावेश रजनीकांत पंचमतीया हे आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. तसेच या गाण्यांना साजेसं संगीत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे आणि पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.   

Tags: digpal lanjekardigpal lanjekar new moviedigpal lanjekar next movieentertainment newsmarathi entertainmentmarathi movieshivrayancha chhava
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Pooja Sawant Goa Trip

लग्नापूर्वी पूजा सावंतची गोव्यामध्ये मित्र-मैत्रीणींबरोबर धमाल पार्टी, प्रार्थना बेहरेही नवऱ्यासह पोहोचली अन्…; फोटो व व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.