अभिनेत्री पूजा सावंत सध्या विशेष चर्चेत आली आहे. ती तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. ती प्रेमात पडल्याचं सांगत आयुष्यातला नवा प्रवास सुरू करत असल्याचं तिने पोस्टद्वारे म्हटलं होतं. तिने सोशल मीडियावर तिच्या जोडीदाराबरोबरचे फोटोही शेअर केले होते. पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याला फोटो टॅग करत तिने खास कॅप्शनही दिलं होत. (Pooja Sawant Goa Trip)
पूजा केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. चाहते तिच्या रिलेशनशिपबद्दल जाणून घेण्यासाठीही उत्सुक होते. यानंतर आता अभिनेत्री एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री पूजा सावंत सध्या गोवा ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहे. गोवा ट्रिपला ती तिच्या इंडस्ट्रीमधील मित्र मंडळींसह गेली आहे.
सध्या पूजा सावंत गोवा ट्रीपसाठी प्रार्थना बेहेरे व भूषण प्रधान यांच्यासह गेली आहे. पूजाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिघेही गोवा ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रार्थनासह तिचा नवराही फिरायला गेला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्याआधी ती तिच्या मित्र मंडळींसह वर्षाअखेरीस फिरायला गेली आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर धमाल मस्ती करताना त्यांचे अनेक व्हिडीओ पूजाने शेअर केले आहेत .
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा असा पार पडला साखरपुडा सोहळा, फोटो आले समोर
पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक हिट सिनेमे देत पूजाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तिने ‘जंगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अभिनयाबरोबरच ही जोडी तिच्या हटके फोटोशूटमुळेही चर्चेत आली.