Dhanashree Verma-Yuzvendra Chahal : कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या लग्नात फूट पडल्याच्या अफवा असून या दोघांचा घटस्फोट होऊ शकतो, अशा चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत. या अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. परंतु, युजवेंद्र चहलने अलीकडेच त्याची पत्नी धनश्रीबरोबरचे सर्व फोटो आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हटवल्यानंतर या चर्चांना अधिक गती मिळाली. यानंतर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले असल्याचंही समोर आलं. अशातच आता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये युजी त्यांच्या तुटलेल्या हृदयाबद्दल तसेच त्याच्या रागाबद्दल बोलताना दिसत आहे.
वास्तविक, युजवेंद्र चहल त्याची पत्नी धनश्रीसह रणवीर अल्लाबदिया उर्फ बेअरबायसेप्सच्या पॉडकास्टवर दिसला होता. यादरम्यान रणवीरने युजवेंद्रला विचारले होते की, तुला राग का येतो? या प्रश्नाला उत्तर देताना युजवेंद्र म्हणतो की, “जेव्हा पाणी डोक्यावरुन जाते, तेव्हा माझ्यासमोर कोण आहे याची मला पर्वा नसते”. यानंतर रणवीर युजवेंद्रला विचारतो की, “तुझी मानसिक स्थिती कशी आहे, तू लपवत असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या पाहिल्या आहेत का?”. यावर युजीने उत्तर दिले की, “२०२१ च्या दुबई विश्वचषकात माझी निवड झाली नव्हती तेव्हा माझ्याबरोबर असे घडले. त्या वेळी मला सर्वात वाईट वाटले”.
पुढे तो म्हणाला, “मी आतून खूप तुटलो होतो. त्यावेळी धनश्री माझ्याबरोबर दुबईत होती. आणि तिने माझा राग हाताळण्यात मला खूप मदत केली. धनश्री माझ्याबरोबर नसती तर मी आणखीनच निराश झालो असतो. तिने मला खूप समजून घेतले आणि मला समजावून सांगितले की, फक्त स्वतःला सिद्ध कर. ती मला असंही म्हणाली की, तुला राग काढायचा असेल तर ग्राउंडवर काढ. तेव्हा मला समजले की ती बरोबर होती. त्यानंतर मी माझा पूर्ण राग मैदानावर दाखवला”.
आणखी वाचा – रस्त्यांची परिस्थिती पाहून ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “वर्षानुवर्षे…”
यादरम्यान युजवेंद्र म्हणाला की, तो सहज रडत नाही. जर तो रडला तर याचा अर्थ त्याला खूप वाईट वाटले आहे असा होतो. यावर रणवीर त्याला विचारतो की, “तू रडला आहेस का?”. यावर युजी सांगतो की, ‘तो बाथरूममध्ये जाऊन रडला आहे. हृदय खूप रडतं पण डोळे नकार देतात. परिस्थिती अशी असते की आपसूक वाईट वाटतं. कित्येकदा आपलं मनही रडतं पण डोळे साथ देत नाहीत”. लॉकडाऊन दरम्यान युजीने धनश्रीशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. आता त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवेमुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.