Dahavi-A Series : ‘इट्स मज्जा’ने काही दिवसांपूर्वी आगामी ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. ‘इट्स मज्जा’च्या गाजलेल्या ‘आठवी-अ’ या सीरिजचाच हा दूसरा भाग आहे. नुकतीच ६ जानेवारीपासून ‘दहावी-अ’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शाळेत घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून पाहता येणार आहे. या सीरिजचा नुकताच पहिला भाग काल (सोमवार ०६ जानेवारी) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Dahavi-A Series first episode)
या पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. त्यानंतर आभ्या आईकडे सायकलची मागणी करतो. मात्र त्याची आई त्याला कामात मदत करण्यावरुन बोलते. त्यानंतर त्याची आई त्याला गावात कोणती तरी जुनी सायकल असल्यास बघ असं म्हणते. रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला त्यांच्या लग्नाविषयी सांगतात. त्या दोघी तिला दहावी होताच रेश्माचं लग्न लावणार असल्याचे म्हणतात. यामुळे रेश्मा काहीशी नाराज होते. त्यानंतर विक्या त्याच्या वडिलांकडे पैसे मागतो.
आणखी वाचा – रस्त्यांची परिस्थिती पाहून ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “वर्षानुवर्षे…”
त्यानंतर शाळेत पोहोचताच आभ्या त्याची इंग्रजीची वही रेश्माला देतो. तेवढ्यात त्याला कळतं की, केवडाला सुद्धा त्याच्या वहीची गरज आहे. त्यामुळे तो रेश्माला इंग्रजीची वही केवढाबरोबर शेअर करण्यास सांगतो. त्यानंतर रेश्मा आभ्याची वही केवडाला देते. पुढे सागऱ्या आभ्या व त्याच्या मित्रांना दहावी अ या वर्गात आल्यावरुन चिडवतो. यादरम्यान त्यांची एकमेकांबरोबर नौकझोक होते. त्यांच्या काहीशी भांडणं पण होतात आणि या भागाची सांगता होते. ‘दहावी-अ’च्या या पहिल्याच भागाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
आणखी वाचा – जुई गडकरीच्या ‘त्या’ फोटोचा गैरवापर, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “असे दुसऱ्याचे फोटो…”
या पहिल्या भागाला एका दिवसांत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर दीड हजारांहून अधिक या व्हिडीओवर कमेंट्स आहेत. जवळपास ५० हजारांच्या जवळपास या भागाला लाईक्स मिळाले आहेत. अवघ्या कमी कालावधीतच या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाल्यामुळे आता या सीरिजच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आभ्या, विक्या, किरण्या, मध्या, रेश्मा व केवडा यांच्या आयुष्यात या ‘दहावी-अ’ या वर्षात काय काय बदल होणार? हेही लवकरच पाहायला मिळेल.