Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Engagement : ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर किरण व वैष्णवी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं. थेट सोशल मीडियावरुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता किरण व वैष्णवी यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. अखेर किरण व वैष्णवी यांचा शाही साखरपुडा समारंभ पार पडला आहे. येत्या १४ तारखेला म्हणजेच उद्या ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. किरण व वैष्णवी यांच्या साखरपुडा समारंभाच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे.
अगदी पारंपरिक अंदाजात किरण व वैष्णवी यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. यावेळी किरणने पांढऱ्या रंगाचा कोट व सदरा परिधान केलेला दिसत आहे. तर वैष्णवीने हिरव्या रंगाची सुंदर अशी नक्षीदार पैठणी नेसली आहे. तर अभिनेत्रीच्या हटके हेअरस्टाईलने तिच्या सौंदर्यात भर घातली आहेत. दोघांचा हा मराठमोळा लूक साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. साखरपुड्याला किरणने गुडघ्यावर बसून वैष्णवीला अंगठी घातली आहे, आणि तिच्या हातावर किसही केलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी दोघांचा हा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – “कितीही गुंडागर्दी करा पण…”, अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, डायलॉगची जोरदार चर्चा
किरण व वैष्णवी येत्या १४ डिसेंबर २०२४ ला लग्नबंधनात अडकणार आहेत. “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्री मंडळातल्या बैठका होत राहतील. मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो. ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’ वैष्णवी कल्याणकर”, असं कॅप्शन देत किरणने वैष्णवीबरोबरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यांच्या या जाहीर कबुलीनंतर सिनेविश्वातून आणि चाहतेमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. आता या जोडीचा अखेरं साखरपुडा समारंभ पार पडला आहे.
आणखी वाचा – रेश्मा शिंदेचा नवरा पवन नक्की काय काम करतो?, युकेमध्ये राहत होता पवन, अभिनेत्रीचं पहिल्यांदाच भाष्य
किरण व वैष्णवी यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोही समोर आले होते. वैष्णवी कल्याणकरला किरणच्या नावाची मेहंदी लागली. अभिनेत्रींच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटोही विशेष चर्चेत राहिले. यावेळी तिच्या मेहंदीच्या लूकनेही साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. आता साऱ्यांच्या नजरा किरण व वैष्णवी यांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत.