राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं गायनक्षेत्राशी नाव जोडलं गेलं आहे. त्यांच्या आवाजातील काही गाणी आजवर प्रदर्शित झाली. अमृता यांनी त्यांच्या गायनाची आवड उत्तमरित्या जोपासली. शिवाय सोशल मीडियावर विविध गायनाचे विविध व्हिडीओही त्या शेअर करताना दिसतात. त्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामद्वार शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये त्या गाणं गाताना दिसत आहेत.
अमृता राज्यासह परदेश दौऱ्यावरही जातात. नुकतंच त्या न्यूयॉर्कला गेल्या होत्या. न्यूयॉर्कमधील भारत महोत्सवाला अमृता यांनी हजेरी लावली होती. या महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अमृता तिथे गेल्या. यावेळी त्यांनी विविध गाण्यांचं सादरीकरण केलं. विशेष म्हणजे गाणं गात असताना त्यांनी नृत्यही केलं. त्याचाच व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर तसेच युट्युब चॅनलद्वारे पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – “अतिशय वाईट चित्रपट…”, नाना पाटेकरांची बॉलिवूडवर सडकून टीका, म्हणाले, “कुवत नसताना…”
अमृता यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या ‘दमादम मस्त कलंदर, अली दा पैला नंबर’ हे गाणं गात आहेत. हे गाणं गात असताना त्या डान्सही करताना दिसत आहेत. तसेच अमृता गाणं गात असताना परदेशातील मंडळी यावर थिरकताना दिसत आहेत. पण सोशल मीडियावर काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – परदेशात गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेला विमानतळावर काढावी लागली रात्र, म्हणाला, “६.३०चं विमान…”
नेटकऱ्यांनी अमृता यांच्या या व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या आहेत. रेल्वेमध्ये प्रवास करत आहे असं वाटत आहे, जर पती उपमुख्यमंत्री असेल तर काहीही करता येतं याचं हे जिवंत उदाहरण, हा आमच्या अन्याय आहे, आता गाणं बंद करा अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. तर काहींनी अमृता यांच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.