मालिका, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. केवळ अभिनयच नाही तर निवेदन, कविता-नाट्य लेखन अशा विविध क्षेत्रात आजवर संकर्षणने आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. सध्या संकर्षण याने लिहिलेली दोन नाटकं मराठी रंगभूमीवर चर्चेत आहे. (Sankarshan Karhade New Post)
‘तू म्हणशील तसं’ व ‘नियम व अटी लागू’ या दोन्ही नाटकांनी प्रेक्षकांना वेड केलं आहे. संकर्षणनं लिहिलेलं आणि गौरी प्रशांत दामले यांची निर्मिती असलेलं ‘नियम व अटी लागू’ हे नवं कोरं मराठी नाटकही रंगभूमीवर आलं आहे. या दोन्ही नाटकांमध्ये संकर्षण काम करत असून दोन्ही नाटकांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या या नाटकाचे परदेश दौरे सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वीच संकर्षनने ‘यूएसअमेरिकेला जाऊन येतो, १४ प्रयोगांची मोठ्ठी वारी आहे’ अशा आशयाची पोस्ट शेअर करून एयरपोर्टवरील फोटो पोस्ट केला होता. आता त्यांनतर संकर्षणने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेलेल्या संकर्षणाला एअरपोर्टवरच रात्र काढावी लागली. यासंदर्भातील एक पोस्ट नुकतीच संकर्षणने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. संकर्षणने या पोस्टमध्ये एअरपोर्ट वरील एक फोटो पोस्ट केला असून, “आजची रात्र एअरपोर्टवर. उद्या सकाळी ६.३० चं विमान आहे Oakland साठी, तुमचं झालं असं कधी ? रात्रं काढावी लागली एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड वर ??” असं कॅप्शन त्याने दिल आहे.
यावरून हे कळतंय की, नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रवास करताना संकर्षणाच्या प्रवासाची वेळ लांबली, आणि त्याला विमानतळावरच एक रात्र काढावी लागली. कलाकार म्हटलं की त्यांना शूटिंगसाठी दिवस रात्र बाहेर राहावं लागत, किंवा त्यांना बरेच दिवस घरापासून दूर राहावं लागत. संकर्षणने ही नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रवास करतानाचा त्याचा अनुभव सोशल मीडियारून शेअर केला आहे.