मराठी चित्रपटसृष्टीत केवळ एका महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवण्याचा विक्रम रचला आहे केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाने. जगभरात या चित्रपटाचे हाउसफुल्ल शोज लागलेले पाहायला मिळतायत. अशातच जगप्रसिद्ध, मराठमोळा क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील ;बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा आनंद घेत चित्रपटाचं, कलाकारांचं कौतुक केलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सचिन तेंडुलकर आणि चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे इत्यादी मंडळी उपस्थित होती.(sachin tendulkar deepa parab)
या प्रसंगी चित्रपटातील एका मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री दीपा परब मात्र उपस्थित न्हवती. परंतु या वेळी सचिन तेंडुलकर यांनी व्हिडिओ कॉल मार्फत दीपाच्या कामाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या निम्मिताने अभिनेत्री दीपाने खास व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सचिन तेंडुलकर सोबतच्या खास संभाषणाचा एक व्हिडिओ दीपाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. दीपाने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय “THE DREAM COME TRUE MOMENT
सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील… त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. (deepa parab baipan bhari deva)
हे देखील वाचा- “ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी..” सचिन तेंडुलकर कडून देखील ‘बाईपण भारी देवाचं’ कौतुक, खास पोस्ट लिहीत म्हणाला “मी माझी आई आणि मावशी…..”
पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण. मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो… आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी.”(baipan bhari deva box office collection)
हे देखील वाचा- “हा सिन लक्षाचा आहे, मी यात….” धुमधडाका चित्रपटातील ‘त्या’ सीन बाबत मामांनी स्पष्टचं सांगितलं
दीपाने तिच्या आयुष्यातील हा एक महत्वाचा फॅन मोमेन्ट असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान सचिनने खास ट्विट करत चित्रपटाचं कौतुक देखील केलं आहे. चित्रपटाच कौतुक करत सचिनने लिहिलं आहे. ““बाईपण भारी देवा” ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला आणि मी माझी आई आणि मावशी सुद्धा हा चित्रपट कधी पाहतायत याची मी वाट बघतोय. शिवाय, चित्रपटातील कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता!”