‘बिग बॉस’ मराठी या रिऍलिटी शोमधून अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे ही जोडी नावारुपाला आली. काही महिन्यांपूर्वी अगदी शाही थाटामाटात त्यांचा लग्नसमारंभ पार पडला. प्रसाद-अमृताच्या लग्नासह त्यांच्या केळवनाचीही बरीच चर्चा रंगली होती. प्रसाद-अमृताच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. पुण्यातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये या दोघांचा लग्नसोहळा उरकला. प्रसाद-अमृताच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. (Amruta Deshmukh Birthday)
प्रसाद व अमृता ही प्रेक्षकांच्या आवडत्या सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. आज अमृता देशमुखचा वाढदिवस आहे. लग्नानंतरचा अमृताचा हा पहिलाच वाढदिवस असून अमृताच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने तिला खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळत आहे. प्रसादने अमृताच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर स्टोरी शेअर करत अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसादने बायकोच्या वाढदिवसानिमित्त केक कापतानाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यामध्ये अमृता केक कापताना करताना पाहायला मिळत असून ती पहिल्यांदाच लग्नानंतर प्रसादसह तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तर प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडीओत त्याने अमृतासाठी छान डेकोरेश केलेलं पाहायला मिळत आहे. हे छान असं सरप्राईज प्रसादने अमृताला दिलेलं पाहायला मिळत आहे. अमृताच्या वाढदिवसाचं होणार जंगी सेलिब्रेशन पाहता ती खूप खुश असलेली पाहायला मिळाली.
प्रसादसह या दोघांचे काही मित्र-मैत्रिणी देखील या सेलिब्रेशन दरम्यान उपस्थित होते. अमृता व प्रसाद अभिनयक्षेत्रातही कार्यरत आहेत. दोघांच्या अभिनयाचे बरेच चाहते आहेत. सध्या अमृता रंगभूमी गाजवताना दिसत आहे. अमृताचं अभिनयावरचं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. आज तिचा वाढदिवस असतानाही ती ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी सज्ज आहे. यातून अमृताची तिच्या कामाप्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे.