शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Deadpool & Wolverine आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 18, 2024 | 4:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deadpool & Wolverine ott release platform announced it will available on amazon prime video

Deadpool & Wolverine ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, जाणून घ्या...

मार्वेल (Marvel) च्या ‘डेडपूल आणि वॉल्व्हरिन’ (Deadpool & Wolverine) आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरत सिनेमॅटिक इतिहास रचला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने $1.3 अब्ज कमाईसह भारत आणि जगभरातील प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन केले. या चित्रपटाने चित्रपटगृहांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार यांची अनेक चाहते वाट पाहत होते. अशातच या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय हा चित्रपट कोणत्या ओटीटी माध्यमावर येणार? याबद्दल माहिती समोर आली आहे. (Deadpool & Wolverine OTT Release)

‘डेडपूल आणि वूल्व्हरिन’ला समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे या चित्रपटाने जगभर प्रचंड कमाई केली. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतातही १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर २०२४ पासून प्राइम व्हिडिओ ऑन डिमांड (PVOD) वर उपलब्ध होईल.

आणखी वाचा – Video : गावी अमरावतीला पोहोचली Bigg Boss Marathi फेम आर्या, लेकीला पाहताच आई ढसाढसा रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

डिस्नी प्लस या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि इतर भारतीय भाषांमध्ये पाहता येईल. मात्र, अद्याप याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. या चित्रपटाचे चाहते या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप याबद्दलची तारीख जाहीर न झाल्यामुळे अनेकजण अजून प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची  चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – अब्दू रोजिकचे लग्न मोडलं, पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर…”

दरम्यान, ‘डेडपूल आणि वूल्व्हरिन’ने भारतातही दमदार कामगिरी केली. या चित्रपटाने भारतात सर्व भाषांमध्ये १३५.२२ कोटींची कमाई केली होती. जगभरातील चित्रपटाने १.३ अब्ज डॉलर्स गोळा करून आश्चर्यकारक कामगिरी केली. चित्रपटातील दोन्ही प्रमुख पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन यांनी या चित्रपटात डेडपूल आणि वॉल्व्हरिनच्या भूमिका केल्या होत्या.

Tags: Deadpool & Wolverine OTT ReleaseDeadpool & Wolverine Release Marathi NewsDeadpool & Wolverine Release News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla marathi serial Leela confessing her love to AJ new promo shared on social media.

गणपती बाप्पासमोर लीला प्रेमाची कबुली देणार, लालबागच्या भरगर्दीत झालं शूट, मंडपात आली तेव्हा...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.