लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा संपूर्ण महाराष्ट्र तसेच देसभरात मोठा चाहतावर्ग आहे. तिने टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्यावर लाखो लोक प्रेम करतात. याआधी तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’ या रियालिटी शो तसेच ‘नागीण’सारख्या मालिकांत दिसलेली आहे. त्यानंतर आता ही अभिनेत्री ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात दिसणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण झालेले आहे. मात्र या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान तेजस्वीचा हात भाजला आहे. खुद्द तेजस्वीनेच याबाबत माहिती दिली आहे. (Tejasswi Prakash in Celebrity Masterchef)
शनिवारी तेजस्वी प्रकाश सेलिब्रिटी मास्टरशेफच्या सेटवर दिसली. शूटिंग संपल्यानंतर तिने पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या. यावेळी बोलताना तिने तिचा हात जळाल्याचं सांगितलं. खाद्यपदार्थ तयार करताना ही जखम झाल्याचं तिने सांगितलं आहे. ओव्हनमुळे तिचा हात भाजल्याचं तिनं म्हटलं आहे. यावेळी तेजस्वीने हाताला क्रिम लावल्याचंही दाखवलं. तेजस्वीची अवस्था पाहून चाहत्यांनीही त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! लग्नपत्रिकेचा पहिला फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्याला अश्रु अनावर
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात तेजस्वी व्यतिरिक्त इतर अनेक टीव्ही कलाकारदेखील दिसणार आहेत. यामध्ये अर्चना गौतम, गौरव खन्ना, निक्की तांबोळी, कक्कर इब्राहिम, उषा नाडकर्णी, राजीव अडातिया आणि फैसल मलिक यांसारख्या प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. अनेकजन आपल्या आवडत्या कलाकारांना या शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते.
आणखी वाचा – “फक्त नेत्याबरोबरच नाही तर…”, प्राजक्ता माळीबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, “एका कलाकाराचं दु:ख…”
दरम्यान, तेजस्वी प्रकाश याआधी ‘नागिन 6’, ‘स्वरागिनी’ आणि ‘बिग बॉस 15’सारख्या शोमध्ये दिसली आहे. विशेषत: ‘बिग बॉस 15’ची ती विजेती होती. या शोदरम्यानच तेजस्वी आणि करण कुंद्राची मैत्री झाली, जी आता प्रेमात बदलली आहे. या दोघांच्या लग्नाचीही चर्चा होत असून त्यांचे चाहते या जोडप्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत.