शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फक्त नेत्याबरोबरच नाही तर…”, प्राजक्ता माळीबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, “एका कलाकाराचं दु:ख…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dancer Gautami Patil supported to actress Prajakta Mali and gave advice not pay attention to trolling

प्राजक्ता माळीला गौतमी पाटीलचा फुल्ल सपोर्ट, ट्रोलिंगकडे लक्ष न देण्याचाही सल्ला

भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह काहींच्या नावांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. प्राजक्ता माळीने काल (शनिवारी) पत्रकार परिषद घेत तिचं या राजकीय घडामोडींवर आणि नाव घेण्याबाबत मत मांडलं. त्याचबरोबर सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत तिने संतापही व्यक्त केला. यावर आता कलाविश्वाटून प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने या प्रकरणी प्राजक्ताला पाठींबा दिला आहे. (Gautami Patil supported to Prajakta Mali)

एबीपी माझाशी बोलताना गौतमी असं म्हणाली की, “सगळ्यात आधी मी प्राजक्ता ताईला सांगते की, ताई तु ट्रोल आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही सर्व कलाकार तुझ्याबरोबर आहोत. तुला ट्रोल जरी केलं तरी तु या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. आज तु जे काही बोललीस ते मी ऐकलं आणि तु जे काही म्हणालीस ते सगळं काही बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार मंडळी तुझ्याबरोबर आहोत. मी सुद्धा एक कलाकार आहे. तर मला म्हणायचं आहे की, कृपया एका कलाकाराला कलाकाराच्या जागी राहुद्या. फक्त नेत्याबरोबरच नाही तर कोणत्याही व्यक्तीबरोबर त्याचं नाव जोडू नका. कारण एका कलाकाराचं दु:ख हे एका कलाकारालाच माहीत असतं”.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! लग्नपत्रिकेचा पहिला फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्याला अश्रु अनावर

यापुढे गौतमीने असं म्हटलं की, “आज कुणाला काय त्रास होत आहे हे तुम्हाला माहीत नाही. तो त्रास त्या व्यक्तीलाच माहीत. आज मला इतकं ट्रोल केलं गेलं. बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाले. पण माझा त्रास मला माहीत आहे. तो त्रास लोकांना माहीत नाही. लोक आपापल्या घरी राहतात. कृपया कुणाबरोबर कुणाचंच नाव जोडू नका, जे खूप चुकीचं आहे. उलट एका कलाकाराला तुम्ही पाठिंबा द्या. त्याच्याबरोबर उभे रहा. सगळेजण प्राजक्ता ताईवर प्रेम करतात. त्यामुळे ताई आम्हीसुद्धा तुझ्याबरोबर आहोत. तु याकडे लक्ष देऊ नकोस. अशीच पुढे जा, हसत रहा आणि खूप छान रहा”.

आणखी वाचा – “ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक, लेखक सचिन गोस्वामी यांनीदेखील या प्रकरणी खास पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजता जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडत आहे ते निषेधार्ह आहे. क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरुया”.

Tags: Gautami Patil on Prajakta MaliGautami Patil supported to Prajakta Maliprajakta mali actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Celebrity Masterchef show Actress Tejasswi Prakash hand injured while cooking see the details

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हाताला गंभीर दुखापत, स्वयंपाक करताना घडला अपघात, नेमकं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.