‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व नुकतेच संपले असले तरी या शोची आणि या शोमधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. शोमधील स्पर्धक रोजच चर्चेत आहेत, यापैकी एका स्पर्धकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे आणि हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर त्याने आपलं नाव कोरल्यापासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये सूरजचीच हवा पाहायला मिळत आहे. शो जिंकल्यानंतर सूरजची अनेकजण भेट घेत आहेत. तोही विविध ठिकाणांना भेटी देत आहे. बारामतीजवळच्या मोढवे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज आता प्रचंड लोकप्रिय झाला आहे. (Gautami Patil and Suraj Chavan Meeting)
‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी आपल्या गावी घेऊन जाताना गावकऱ्यांनी त्याची मोठी मिरवणूक काढली. त्यानंतर अनेक मान्यवर मंडळींनी त्याची भेट घेतली. गेल्या आठवड्यात सूरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटला आणि त्याच्या या भेटीगाठी अजूनही सुरुच आहेत. अशातच सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे लोकप्रिय असलेली गौतमी पाटीलनेही सूरज चव्हाणची भेट घेतली आहे. गौतमीने सूरजच्या या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सूरज व गौतमीचे अनेक चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
आणखी वाचा – ‘पाऊस’ वेबसीरिजमधील ट्वीस्ट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजूनही सायलीला विशालची आठवण, पुढे काय घडणार?
गौतमी व सूरज हे दोघेही सोशल मीडिया स्टार आहेत. गौतमी पाटीलचा कोणताही कार्यक्रम असो तिथे तुडूंब गर्दी बघायला मिळते. गौतमीची एक झलक बघण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यात सूरजने ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावल्यामुळे त्याचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. गौतमी व सूरज यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. “गौतमी आणि सूरज यांनी एक असं उदाहरण घालून दिलं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करा फक्त आपल्याकडून १००% दिले पाहिजे मग त्याचं फळ ईश्वर देईल” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये गायकांना मिळते कवडीमोल रक्कम, सुप्रसिद्ध गायकानेच आणलं सत्य समोर, म्हणाला, “पैसे मागितले तर…”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणने एन्ट्री घेतली होती तेव्हा अनेकांनी त्याच्याबद्दल नाकं मुरडली होती. त्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र सूरजने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने आणि वागणूकीने अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे अनेकांचा नावडता सूरज आता सर्वांचाच आवडता झाला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.