शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पाऊस’ वेबसीरिजमधील ट्वीस्ट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजूनही सायलीला विशालची आठवण, पुढे काय घडणार?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 18, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Itsmajja Original Paus Series updates

‘इट्स मज्जा’ची ‘पाऊस’ सीरिज अंतिम टप्प्यावर

‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि या हमीपूर्ततेसाठी ‘इट्स मज्जा’ कायमच मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी ‘इट्स मज्जा’ ‘पाऊस’ या नवीन सीरिजमधून एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वेबसीरिजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. मात्र आता ही सीरिज अंतिम टप्प्यावर आली आहे. (Itsmajja Paus Series)

Wrong Number ने सुरु झालेली सायली-विशाल यांची Right Lovestory प्रेक्षकांना खूपच भावली. या दोघांमधील प्रेमाचे काही खास क्षण प्रेक्षकांनी चांगलेच एन्जॉय केले. पण आता सायली-विशाल यांची ही प्रेमकहाणी एका निर्णायक वळणावर आली आहे. नुकतंच सायलीचे रोहितबरोबर लग्न झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आणि सायली गरोदर असल्याचेही पाहायला मिळाले. विशालच्या आठवणीत सायलीने त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण तो तिथे नसल्याने तिने त्याला एक पत्र लिहिले, ज्यात तिने तिचं लग्न झाल्याचे सांगितले. तसंच तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही असंही म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

गेल्या अनेक दिवसांपासून सायली आणि विशाल एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण नियतीने दोघांची भेट घडवून आणली नाही. पण अखेर आता सायली आणि विशाल एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे आता एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोघे पुन्हा एकत्र येणार का?, प्रेक्षकांना हवहवीशी वाटणारी लव्हस्टोरी पुन्हा नव्याने सुरु होणार का? की, सायली आणि विशाल यांच्या वाटा वेगळ्या होणार? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेली आहे.

आणखी वाचा – सुखी संसाराची २५ वर्षे! लग्नाच्या वाढदिवसाला डॉ. नेनेंकडून माधुरी दीक्षितचं तोंडभरुन कौतुक, Unseen फोटो समोर

‘पाऊस’ या सीरिजमध्ये ‘सुंदरी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री आरती बिराजदारने सायली ही भूमिका साकारली आहे, तर आरतीला अभिनेता अक्षय खैरेची साथ मिळाली आहे. अक्षय खैरेसुद्धा आजवर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती व अक्षय या मुख्य दोन भूमिकांच्या अवतीभवतीची असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकारदेखील पाहायला मिळाले.

आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये गायकांना मिळते कवडीमोल रक्कम, सुप्रसिद्ध गायकानेच आणलं सत्य समोर, म्हणाला, “पैसे मागितले तर…”

दरम्यान, ‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचे असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांची आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. ‘पाऊस’ ही लोकप्रिय सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे सोमवार व गुरुवारी दुपारी १.३० वाजता प्रदर्शित होते.

Tags: Itsmajja Original Paus SeriesPaus Series Marathi NewsPaus Series News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
Shiv Thakare with grandfather Video

नातू असावा तर असा! शिव ठाकरेने वाढदिवसाला आजीला दिलं मोठं सरप्राइज, बोटीमध्ये पार्टी, ताज हॉटेलमध्ये जेवण अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.