Armaan Malik Car Accident : ‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून चर्चेत आलेला YouTuber अरमान मलिक अनेकदा चर्चेत असतो. विशेषतः अरमान त्याच्या दोन लग्नांमुळे अनेकदा ट्रोल होताना दिसला आहे. अरमान मलिक जेव्हापासून ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये त्याच्या दोन्ही पत्नींसह दाखल झाला तेव्हापासून त्याला टीकेचा सामना करावा लागला. या सगळ्याच्या दरम्यान, अरमान मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने एका मोठ्या अपघातातून बचावल्यानंतर मर्सिडीजला खोदून बाहेर काढले असल्याचं सांगितलं आहे.
अरमान मलिकने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले की, तो त्याच्या आगामी म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगसाठी मनालीला गेला होता. चंदीगडला परत येत असताना त्याचा अपघात झाला. अरमान समोरच्या सीटवर तर त्याची पत्नी कृतिका मागच्या सीटवर बसली होती. प्रवासादरम्यान त्यांच्या मर्सिडीजचे टायर फुटले. अरमान मलिक म्हणाला, “तर मित्रांनो, आज एक आठवड्यापूर्वी मी कारबद्दल तक्रार केली होती. म्हणजे ही इतकी वाईट कार आहे”.
आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये गायकांना मिळते कवडीमोल रक्कम, सुप्रसिद्ध गायकानेच आणलं सत्य समोर, म्हणाला, “पैसे मागितले तर…”
अरमान मलिक म्हणाला, “आम्ही नुकतेच मनालीहून शूटिंग करुन परत आलो आहोत, कारचा संपूर्ण टायर फुटला आहे आणि कार असंतुलित आहे. याचा अर्थ, जर याबद्दल बोललो तर आम्ही मृत्यूच्या जबड्यातून परत आलो आहोत. ही अशी वाईट कार आहे. मी सर्वांना विनंती करेन. ही गाडी अजिबात घेऊ नका”, असं म्हटलं. अरमान मलिक कारच्या गुणवत्तेमुळे खूपच निराश दिसत होता.
आणखी वाचा – नवा व्यवसाय की आणखी काही?, मृणाल दुसानिसची नवी सुरुवात, शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा, नेटकरी म्हणाले…
अरमान मलिक म्हणाला, “बरेच लोक विचारतील भाऊ ही कोणती कार आहे? ही कार मर्सिडीज जीएलएस 450 डी आहे. भाऊ, या कारपासून दूर रहा आणि ज्यांच्याकडे ही कार आहे त्या सर्वांना विनंती म्हणून मी हे सांगेन, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे टायरची कमतरता. याचा अर्थ, असा की आज आपल्याबरोबर जी काही दुर्घटना घडली, ती देवाच्या कृपेनेच वाचली असे मला वाटते”.