Amitabh Bachchan Cryptic Post : बिग बी अमिताभ बच्चन यांचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. अमिताभ यांनी आजवर त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते सोशल मीडियाद्वारे काही ना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अमिताभ बच्चन भले खूप व्यस्त असतील, पण ते नक्कीच त्यांच्या भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त करतात आणि त्यांचे विचार त्यांच्या ब्लॉग आणि ट्विटरवर दररोज शेअर करतात. पण काही तासांपूर्वी अमिताभ यांनी असे ट्विट केले की ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. इतकेच नव्हे तर सर्व काही ठीक आहे का?, नक्की काय झालं आहे?, असे अनेक प्रश्न ते विचारु लागले आहेत.
८२ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३४ वाजता केलेल्या एका ट्विटने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, “जाण्याची वेळ आली आहे”. अमिताभ यांचे हे ट्विट पाहून चाहते अस्वस्थ झाले. एका चाहत्याने लिहिले की, “साहेब असे बोलू नका”. तर दुसऱ्या एका चाहत्याने विचारले, “काय झाले सर?”. तर आणखी एका चाहत्याचे ट्विट होते, “सर जी, तुम्हाला लिहायचे काय आहे?”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पहिला फोटो समोर
T 5281 – time to go ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 7, 2025
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये ते कशाबद्दल बोलत आहेत याबद्दल काहीही स्पष्ट केले नाही. मात्र या ट्विटनंतर चाहत्यांची अस्वस्थता वाढली असून काय झाले हे जाणून घेण्यासाठी ते आतुर झाले आहेत. अमिताभ यांनी नुकताच मुलगा अभिषेक बच्चनचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी अभिषेकचा बालपणीचा फोटो शेअर केला. हा फोटो अभिषेकच्या बालपणातील आहे. अभिषेक बच्चनला इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले आणि अमिताभ मॅटर्निटी वॉर्डमध्ये त्याच्याकडे पाहत उभे होते.
आणखी वाचा – विकी कौशलने कतरीना कैफची नाना पाटेकरांशी केली तुलना?, म्हणाला, “कंट्रोल उदय…”
व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ होस्ट करत आहेत. २०२४ मध्ये रजनीकांत स्टारर ‘वेटियान’ या चित्रपटात ते दिसले होते. सध्या त्याने कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही, मात्र नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये तो दिसणार असल्याचे बोलले जात आहे.