अभिनेता, दिग्दर्शक, शाहीर, कवी, गायक, वादक, वक्ता आदी सर्व कलांचा सुंदर मिलाफ म्हणजे दादा कोंडके. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमवीर म्हणून आपल्या नावाचा डंका करणारे मराठी कलावंत म्हणजे दादा कोंडके. अशा या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाची विनोद म्हंटल की आठवण आलीच पाहिजे. मात्र आज त्यांची आठवण काढण्याचे खास औचित्य म्हणजे आज दादांचा स्मृतिदिन. भजन, ढोल, ताशे, लोकनाट्य अशा अनेक कलागुणांतून दादांनी आपली कारकीर्द सुरु केली. कलाक्षेत्राचा कोणताही वारसा नसताना दादांनी कलाक्षेत्रात कशी एन्ट्री घेतली हे चंदुभाई देशपांडे यांनी ‘सहवास दादा कोंडकें’चा या पुस्तकात मांडलंय. (dada kondke)
दादा तुम्ही दादागिरी करत होतात, मग या कलाक्षेत्रात कसे आलात? असे चंदुभाई देशपांडे यांनी दादांना विचारले असता दादा म्हणाले, ‘तसा मी मूळचा कलावंत नव्हे. व्रात्य अन खोडकर होतो, पण या व्रात्यपणात सुद्धा माझी विनोदबुद्धी जाणवण्याइतकी होती.’ आमच्या लहानपणी गिरणगावात ‘मेळा’ नावाचा एक करमणुकीचा प्रकार होता. या मेळ्यात कलाप्रकार सादर केली जात, कोणी गाणं म्हणे, कोणी नकला करी, कोणी नृत्य करी, तर कोणी ‘स्वगत’ म्हणून दाखवी. अशाप्रकारे लोकांचं मनोरंजन होत असे. मी अशाच मेळ्यामध्ये लहानपणी काम करायचो. माझी गाणी आणि नकला लोकांना विशेष आवडायच्या. माझ्यात कला, गुण आहेत, याची जाणीव मला त्यावेळेपासून झाली.
पहा कशी झाली दादा कोंडकेंची सिनेसृष्टीत एंट्री (dada kondke)

“पुढं मोठा झाल्यावर मी भोईवाड्यातल्या ‘श्रीकृष्ण बँड पथकात ‘ सामील झालो. तिथं मी क्लेरोनेट, ट्रंपेट, सॅक्सोफोन, पट्टी तरंग ही सगळी वाद्ये वाजवायला शिकलो. ढोल, ड्रम तर सोपाच होता. आम्ही लग्नाच्या वरातीच्या सुपाऱ्या घेत होतो आणि मी त्यातही वाद्ये वाजवायचो.’ “हळूहळू मी राष्ट्रसेवादलाच्या लोकांच्या संगतीत आलो आणि त्यांच्या संस्कारामुळे माझी गुंडगिरी थोडी कमी झाली होती. (dada kondke)
====
हे देखील वाचा – नाटू नाटू…. छे, छे नाचो नाचो
====
राष्ट्रसेवादल ही समाजवादी पक्षाची पाठशाळा त्यामुळे मी समाजवादी बनलो. त्यानंतर कलापथक. मुंबई कामगार मधील मंडळी जमवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. लोकनाट्यांनी खऱ्या अर्थाने माझी उपजत विनोदबुद्धी आणि काव्यप्रतिभेला संधी मिळाली. काही गाण्यांना चाल लावत ती सादर करत असे कधी कधी लोकनाट्यात लोकांना हसविण्यासाठी काही ऑडिशन्सही घेऊ लागलो. अशाप्रकारे माझ्यातला दादा मावळून शाहीर दादा कोंडके उदयाला आला.
मराठी चित्रपटसृष्टीत एक युग निर्माण करणारा हरहुन्नरी कलावंत दादा कोंडके यांना आपण कधीही विसरू शकत नाही. पडद्यावर पाहण्या इतकंच त्या कलाकारच रूप नव्हतं तर खऱ्या आयुष्यातही तो व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून अव्वल होता, यांत वादच नाही. लोकांना खळखळून हसवणारे हे दादा कोंडके पुन्हा होणे नाहीच.
