छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या अनेक वेगवेगळ्या विषयाच्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. या मालिकांनी प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनात मनोरंजनाची एक वेगळी मेजवानी सादर करत रंगत निर्माण केली आहे. अनेक वाहिन्यांमार्फत प्रदर्शित केल्या जाणाऱ्या या मालिका मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. मालिकांच्या या शर्यतीत आघाडीची मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. विशेष करून मालिकेतील जयदीप गौरी या जोडीला भरभरून प्रेम मिळत आहे.(Sukh Mhanje Nakki Kay Asta)
प्रत्येक मालिकेतील जोडी ही नेहमीच प्रेक्षकांच्या मनात बसते पण या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना या मालिकेतील नकारात्मक भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी आणि अभिनेत्री भक्ती ही जोडी सुद्दा चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.
=====
दे देखील वाचा- मी मूळचा कलावंत नव्हे..’ असे म्हणणाऱ्या दादा कोंडकेंनी गाजवलं सिनेविश्वात एक युग
=====
कोणतंही कथानक हिट ठरण्यासाठी चांगल्या सकारात्मक भूमिकांसोबतच आवश्यकता असते ती चांगल्या नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची. सध्या सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत जयदीप गौरीच्या खेळीचा शालिनी कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. तर जयदीप कडे असलेल्या पुराव्यांचा आधार घेत जयदीप गौरी शालिनीला जेल मध्ये पाठवण्याच्या तयारीत आहेत. तर आता शालिनीच पात्र या मालिकेतून निरोप घेणार का या संभ्रमात प्रेक्षक दिसत आहेत. पण अशातच सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत एका नव्या खलनायिकेची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.(Sukh Mhanje Nakki Kay Asta)

खास करून नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाणारी एक हटके अभिनेत्री अतिषा नाईक या अभिनेत्रीची सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत एन्ट्री होणार आहे. मंगल हे अतिषा साकारणार असलेल्या पात्राचं नाव असल्याचं समोर आलं आहे. तर नकारात्मक भूमिकांमध्ये आता कोण सरस ठरतंय हे पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेतील जयदीप गौरी सह लक्ष्मी या बालकलाकारावरही प्रेक्षक तेवढच प्रेम करत असल्याचं दिसतंय.