भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दलच्या विविध चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. धनश्री वर्मा व युझवेंद्र चहल यांचा घटस्फोट होत असल्याची अफवा पसरली आहे. क्रिकेटर युजवेंद्र चहल इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर मस्ती करताना पाहायला मिळतो. पण आता त्याच्या एका कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक, क्रिकेटरने पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्रीला त्याच्या इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे आणि तिच्याबरोबरचे सर्व फोटोही हटवले आहेत. (yuzvendra chahal social media post)
धनश्रीनेही युजवेंद्रला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण त्याच्याबरोबरचे फोटो हटवलेले नाहीत. सोशल मीडियावरील हटवलेल्या फोटोमुळे युजवेंद्र व धनश्री यांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत आणि यामुळेच आता हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटलं जात आहे. याच दरम्यान आता युझवेंद्रने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी त्याच्या आयुष्यात सुरू असलेल्या अशांततेकडे लक्ष वेधत आहे. युजवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये क्रिकेटरने वेदना, चरित्र आणि प्रवास याविषयी सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने असेही म्हटले आहे की, लोकांनी त्यांच्या पालकांना अभिमान वाटावा कारण यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. युझवेंद्रने पोस्टमध्ये लिहिले आहे आहे की, “कठोर काम लोकांचे चारित्र्य ठळक करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे. इथे येण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “तुम्ही उंच उभे आहात. तुझ्या वडिलांचा आणि आईचा अभिमान वाटावा यासाठी तू खूप कष्ट केलेस. नेहमी अभिमानी मुलासारखा छाती उंच करून उभा राहिले पाहिजे”. युजवेंद्रने या पोस्टबरोबर हात जोडलेला इमोजी देखील पोस्ट केला आहे. दरम्यान, याआधी ही या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. २०२३ मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा झाल्या होत्या