सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 फेम अभिनेत्रीची स्टार प्रवाहवरील ‘या’ मालिकेत एन्ट्री, साकारणार ‘ही’ डॅशिंग भूमिका, चाहत्यांकडूनही कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2025 | 1:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
बिग बॉस मराठी ५ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, चाहते उत्सुक

बिग बॉस मराठी ५ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, चाहते उत्सुक

‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्व गाजवणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. या शोमध्ये तिला टास्क क्वीन म्हणून ओळखलं गेलं. बिग बॉस मराठीमध्ये अभिनेत्री अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. बिग बॉसमध्ये टास्क खेळणं असो वा पॅडी कांबळे यांचा अपमान असो. प्रत्येक कारणाने जान्हवी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र त्यानंतर आपल्या वागणुकीने तिने सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतरही तिने यअनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. अशातच आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री लवकरच एका मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (janhavi killekar entry in aboli serial)

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लवकरच्या नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकेत जान्हवी झळकणार आहे याचा खुलासा ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात झाला आहे.  ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ च्या नुकत्याच झालेल्या भागात एक चोर सिद्धार्थ जाधवकडे येतो आणि सांगतो की, मी एक चोर असून मला मॅडमनी खूप मारलं आहे. तेव्हा सिद्धार्थ विचारतो, “तुला कोणी मारलं?” तर चोर म्हणतो, “पोलीस मॅडमने मारलं.” त्यानंतर जान्हवीची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला, दुचाकीचा धक्का लागताच झाला वाद, चाकू व लोखंडी रॉडने वार केले अन्…

‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या या भागात ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘अबोली’ मालिकेची टीम सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी ‘अबोली’ मालिकेच्या टीमच्या कलाकारांनी फिकट गुलाबी रंगाचे आउटफिट घातले आहेत. तसंच जान्हवीने देखील फिकट गुलाबी रंगाचा आउटफिट घातला आहे. त्यामुळे जान्हवी किल्लेकरची ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री होणार असल्याचे समोर आले. या मालिकेत ती इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील ही डॅशिंग भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा – “तुमचा प्रवास…”, घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान क्रिकेटर युजवेंद्र चहलची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “तुमची वेदना…”

त्यामुळे आजवर नकारात्मक भूनिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जान्हवी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या नवीन भूमिकेसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. तिला या नवीन भूमिकेत बघण्यासाठी आतुर असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याआधी जान्हवी किल्लेकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती

Tags: janhavi killekarjanhavi killekar entry in aboli serialJanhvi Killekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte fame Actress Rupali Bhosle bought new luxury car and she shared video on social media.

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने घेतली 'ही' महागडी कार, भावुकही झाली अन्...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.