प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य नेहमीच आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. तसंच अभिजीतने एक हजारहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारा अभिजीत त्याच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळेसुद्धा कायम चर्चेत राहत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने एक दावा केला होता की, संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षाही श्रेष्ठ होते. तसंच त्याने महात्मा गांधींना भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिताही म्हटलं होतं. यामुळे आता तो एका नव्या वादात अडकल्याची चिन्हे दिसत आहेत. अभिजीतने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर ही वक्तव्य केलं होतं. (Amitabh Bhattacharya legal notice)
या वक्तव्यामुळे तो आता अडचणीत सापडला आहे. पॉडकस्टमध्ये महात्मा गांधींना ‘पाकिस्तानचे राष्ट्रपिता’ म्हटल्यामुळे त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. पुण्यातील एका वकिलाने गायकाला ही नोटीस पाठवली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, यावरून वाद झाला आणि पुण्याचे वकील असीम सरोदे यांनी अभिजितला याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी केली. अभिजीतने त्याच्या वक्तव्याबद्दल लेखी माफी मागावी, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – 05 January Horoscope : मेष, मीन व कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिवारी होणार सकारात्मक बदल, जाणून घ्या…
गायक अभिजीत भट्टाचार्यने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्याचंही पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, “गांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि बंधुतेच्या आदर्शांना चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले. स्वातंत्र्य चळवळीतील राजकीय परिस्थिती जेव्हा भारताचे दोन राष्ट्रांमध्ये विभाजन होण्याच्या मार्गावर होती, तेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते की मी मरेन, पण फाळणी मान्य करणार नाही. मी जिवंत असेपर्यंत भारताची फाळणी कधीच मान्य करणार नाही”.
आणखी वाचा – सेटवरील मेकअप मॅनसाठी धावून आला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे सांगितली संपूर्ण व्यथा, मदतीचेही केलं आवाहन
दरम्यान, अभिजीत भट्टाचार्य यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “भारत पूर्वीपासून अस्तित्वात होता, पाकिस्तान नंतर भारतापासून वेगळा झाला. पाकिस्तानच्या अस्तित्वाला ते जबाबदार होते. गांधींना चुकून भारताचे राष्ट्रपिता म्हटले गेले.” तसंच “आरडी बर्मन हे संगीत जगतात राष्ट्रपिता होते आणि ते महात्मा गांधींपेक्षा मोठे होते”. गायकाच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना फटकारले आहे.