शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभमनबरोबरच्या फोटोंवर सारा तेंडुलकर स्पष्टचं बोलली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या नावाने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 22, 2023 | 7:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
cricketer sachin tendulkar daughter sara tendulkar react on her instagram story after her deepfake photo with shubhman gill

शुभमनबरोबरच्या फोटोंवर सारा तेंडुलकर स्पष्टचं बोलली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या नावाने...”

संपूर्ण देशभरात तंत्रज्ञानाचा गैरवापर करत डीपफेक व्हिडिओ बनवणे तसेच फोटोबरोबर छेडछाड करणे हा चिंतेचा व चर्चेचा मुद्दा बनला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, काजोल देवगण यांच्या अनेक फोटो-व्हिडीओची छेडछाड करण्यात आली होती. या तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची मतदेखील व्यक्त केली आहेत.

अशातच आता सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण काही दिवसांपूर्वी साराचा शुभमन गिलबरोबरचा एक फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान या सगळ्यावर तिने आता भाष्य केलं आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि तो वापर करणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी करत ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “आमिर खानपासून अगदी अमिताभ बच्चनपर्यंत…”, बायकोच्या कामाचं कौतुक करत नम्रता संभेरावचा पती भावुक, म्हणाला, “…म्हणून मी तिचं कौतुक”

साराने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांचा आनंद, दुःख व दैनंदिन घडामोडी व्यक्त करण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. पण तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापराने सत्य व खरेपणा एकमेकांपासून दूर जात आहे, आणि हे काळजी करण्याचे कारण आहे. माझ्या व्हायरल झालेल्या डीपफेक फोटोंबाबत मला कळलं, माझ्या नावाने एक्स (ट्विटर)वर एक फेक अकाऊंट आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते चुकीच्या पद्धतीने पोस्ट तयार करतात. माझं स्वत:चं एक्स (ट्विटर)वर कोणतंही अधिकृत अकाऊंट नाही” असंही तिने म्हटलं आहे. यापुढे तिने ट्विटरने अशा फेक अकाऊंटविरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर “मनोरंजनासाठी सत्याला किंमत मोजावी लागू नये. विश्वास व खरेपणाच्या संवादाला प्रोत्साहन देऊया,” असंही साराने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – “मागासलेले लोक…”, प्रसाद ओकच्या पत्नीने लेकाच्या शिक्षणावरून ट्रोल करणाऱ्याला सुनावलं, म्हणाली, “नजर लावू नका…”

दरम्यान काही दिवसांपूर्वी शुभमन गिलबरोबर साराचा व्हायरल झालेला फोटो हा डीपफेक होता. साराने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या अर्जुनबरोबरच्या फोटोला चुकीच्या पद्धतीने एडिट केले होते. या फोटोत अर्जुनच्या चेहऱ्यावर शुभमनचा फोटो एडिट करुन लावण्यात आला होता आणि त्यामुळे सारा व शुभमन यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Tags: bollywood newsentertainmententertainment newssara tendukarshubhman gill
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Orry In Bigg Boss 17

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून होणार ओरीची एन्ट्री, सलमानसह चित्रीकरणास करणार सुरुवात, नक्की ओरी आहे तरी कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.