बरेच दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अपडेट समोर येत होते. हार्दिक व नताशा घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्याही वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. नताशा स्टॅनकोविकने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हार्दिक पांड्याबरोबरच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले होते. असा दावाही केला जात होता की, अभिनेत्रीने तिच्या नावातून पांड्या हे आडनाव काढून टाकले आहे. पण आता नताशाने असे काही पाऊल उचलले आहे ज्याने संपूर्ण सत्य समोर आले आहे. आता नताशाने या सर्व वृत्तांना पूर्णविराम देत खुलासा केला आहे. (Hardik Pandya Divorce)
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो काढून टाकले आहेत. मात्र आता हे फोटो पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसू लागले आहेत. तिच्या या पावलामुळे ती आणि हार्दिकचा घटस्फोट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नताशाच्या इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा हार्दिकबरोबरच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते खूप खूश आहेत. एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, “तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंद झाला”. आणखी एका चाहत्याने म्हटले की, “दोघंही एकत्र आल्याचा मला आनंद आहे”.
एकीकडे नताशा आणि हार्दिकच्या लग्नाचे फोटो रि-स्टोअर केल्यानंतर चाहते आनंदी आहेत, तर दुसरीकडे काही युजर्स दोघांवर घटस्फोटाची खोटी बातमी पसरवल्याचा आरोप करत आहेत. एका यूजरने यावरुन कमेंट करत असं म्हटलं की, “तुम्हाला आणि तुमच्या पीआर टीमला सलाम. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या नकारात्मक प्रसिद्धीचे तुम्ही घटस्फोटाच्या सहानुभूतीत रूपांतर केले हे छान आहे”.
नताशा आणि हार्दिकने २०२० मध्ये कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर २०२३ मध्ये या जोडप्याने पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न केले. नताशा-हार्दिक यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसारही लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य असे आहे.