सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्याचबरोबर सोशल मीडियावरील प्रश्नोत्तराद्वारेही कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांची मतं जाणून घेत असतात. अशाच लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत. मालिकेबरोबरच त्या सोशल मीडियाद्वारेही चांगलेच चर्चेत राहत असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच त्यांनी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेबद्दल अनेक प्रश्न विचारले.

मालिकेत नुकताच विरोचकाचा वध झाल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. याच ट्विस्टबद्दल ऐश्वर्या यांना एका चाहत्याने “विरोचकाचा वध झाला मग मालिका संपली का?” असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देत ऐश्वर्या यांनी असे म्हटले की, “विरोचक सध्या घर शोधत आहे.” तर आणखी एका चाहत्याने “मालिका संपली का?” असा प्रश्न विचारला. याचे ऐश्वर्या यांनी “नाही” असं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच आपल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिनयासह त्या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.