बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडंन गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेट. शनिवारी १ जून रोजी रात्री उशिरा रविनावर मुंबईतील वांद्रे परिसरात तीन जणांवर अत्याचार व मारहाणी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. रविनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रविनाला स्थानिकांनी घेरल्याचे दिसून येत आहे. पण या सर्व प्रकणामध्ये रविना निर्दोष असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान हा वाद कार पार्किंगवरुन झाल्याचे समोर आले. पण आता प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतने देखील उडी घेतली आहे. (kangana ranuat on raveena tondon)
रविनाला पाठिंबा देत कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी करत पाठिंबा दिला आहे. तिने स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “रविनाबरोबर जे काही झालं ते खूप चुकीचं झालं. जर समोर अजून पाच-सहा व्यक्ती अधिक असत्या तर खूप गर्दी झाली असती आणि अशा प्रकाराचा मी निषेध करते. त्या लोकांना काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. तसेच अशा प्रकारच्या हिंसक व दूषित व्यवहार होत असतील तर सावध झाले पाहिजे”. कंगनाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

दरम्यान, रवीनाचा ड्रायव्हर तिच्या घराजवळ रिव्हर्समध्ये कार पार्क करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी त्यांच्या गेटजवळून एक कुटुंब जात होते. त्यांना वाटले की त्यांची कार त्यांना धडकली आणि यावरून वाद झाला. रवीनाही या वादात सामील झाली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. हे प्रकरण सध्या तिच्या वकिलाकडे असल्याने रवीनाने कोणतेही वक्तव्य करणे टाळले आहे. पण रविना या सर्व प्रकरणामध्ये नेमके काय बोलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘पटना शुक्ला’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली होती. यामध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती. तसेच हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच १९९२ साली अपूर्ण राहिलेला चित्रपट ‘टाइम मशीन’ हा चित्रपटदेखील २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.