सध्या सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर्सची चांगलीच चलती आहे. सोशल मीडियावरील अनेक कंटेट क्रिएटर्स आपल्या आगळ्यावेगळ्या कंटेटने नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय व प्रसिद्ध कंटेट क्रिएटर म्हणजे ‘बिनधास्त मुलगी’ फेम गौरी पवार. छोटीशी दिसणारी पण आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी गौरी पवार सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
गौरी ही तिच्या आजीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे तिच्यासह तिची आजीही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता असल्याचे पाहायला मिळते. मोबाईलच्या स्क्रीनवरील या आजी-नातीच्या लोकप्रिय जोडीने नुकतीच टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी गौरीच्या आजीने अलका कुबल यांच्याबरोबर खास डान्स केला. याबद्दल गौरीने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये गौरीने असं म्हटलं आहे की, “आजीला टीव्हीवर घेऊन येणे हे माझे एक स्वप्न होते. जे दोन वेळा साकारही झाले. पण यावेळी आजी तिची आवडती अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल यांना भेटणार होती. ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’च्या शोमध्ये आम्ही प्रेक्षकांमध्ये बसलेलो असताना आजीने मला “अलका कुबल माझ्याबरोबर एक फोटो काढतील का?” असा प्रश्न विचारला. यानंतर स्टेजवर जाताच आजी व अलका कुबल यांनी एकमेकींना इतकी घट्ट मिठी मारली की, जणू काही त्या दोघी अगदी जुन्या मैत्रिणीच आहेत आणि हे सगळं पाहून आमच्या सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले”.
यापुढे गौरीने असं म्हटलं आहे की, “सगळे मला म्हणतात की, तुझ्यामुळे आजी हे दिवस जगत आहे. पण मला असं वाटतं की आम्ही दोघी एकमेकींसाठी मैत्रिणी आहोत. आजी नेहमी असं म्हणते की, “आज गौरामुळे मी आहे आणि माझ्यामुळे गौरा”. पण हे सगळं शक्य झालं ते तुम्हा सर्व प्रेक्षकांमुळे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार. फक्त कुटुंब असून चालत नाही. आपले काही मित्रही असतात, ज्यांचा आपल्या आयुष्यात मोठा वाटा असतो”.
आणखी वाचा – अमोलने काढलं आई-वडिलांचं चित्र, अर्जुनचं सत्य सिंबाला माहित झाल्याचे अप्पीला कळणार का?, पुढे काय घडणार?
दरम्यान, गौरीने शेअर केलेल्या या पोस्टला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या पोस्टवर गौरी व आजीच्या अनेक चाहत्यांसह अभिनेत्री अलका कुबल यांनीही कमेंट केली आहे. गौरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. a